शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

नागरिक हो तुम्हीही व्हा आता पर्यावरण संशोधक !; पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांची नवी चळवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 18:16 IST

सिटीझन सायन्स 

संदीप बोडवेमालवण : जगभरात हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास, जंगलतोड, जलसंकट आणि प्रदूषण यासारखी अनेक संकटे वाढत आहेत. या आव्हानांचा परिणाम फक्त निसर्गावरच नाही, तर थेट मानवी जीवनावर होत आहे. पाऊस अनिश्चित होणे, उन्हाळ्याचे तापमान वाढणे, पाणीटंचाई, पूर व दुष्काळ यांच्या वारंवारिता – हे सारे बदल आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत. ही समस्या केवळ वैज्ञानिक किंवा सरकारी पातळीवर सोडवता येणार नाही. संपूर्ण समाजाने एकत्रितपणे पुढाकार घेणे गरजेचे आहे. यासाठीच सिटीझन सायन्स म्हणजेच नागरिक विज्ञान ही संकल्पना जगभरात वेगाने पुढे येत आहे. 

नागरिक विज्ञान म्हणजे काय? नागरिक विज्ञान म्हणजे सामान्य नागरिकांनी वैज्ञानिक संशोधनासाठी आपला सहभाग नोंदवणे. यात शास्त्रज्ञ नसलेल्या व्यक्ती हवामान निरीक्षण, पक्षी व प्राणी गणना, नदी-तलावांचे परीक्षण, झाडांची नोंदणी, कचरा मॅपिंग अशा क्रियाकलापांतून उपयुक्त माहिती गोळा करतात. या माहितीचा उपयोग शास्त्रज्ञ संशोधन, हवामान बदलाचा अभ्यास, वन्यजीवांचे संवर्धन, धोरणे ठरवणे यासाठी करतात. विशेष शैक्षणिक पात्रता आवश्यक नसते; जिज्ञासा, निरीक्षणशक्ती आणि निसर्गाशी जोडलेले मन हेच याचे खरे भांडवल आहे. आज मोबाईल अॅप्स, GPS, फोटोग्राफी, इंटरनेट यामुळे कोणालाही निरीक्षणे नोंदवून ती शास्त्रज्ञांपर्यंत पोहोचवता येतात. यामुळे लाखो स्वयंसेवकांचा एक विशाल डेटा-नेटवर्क तयार होतो, जो संशोधनासाठी अमूल्य ठरतो. देहराडून राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर नागरिक विज्ञानाची ताकद प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत एफटीसीबी द्वारे प्रायोजित, केंद्रीय राज्य वनसेवा अकादमी च्या वतीने आयोजित उत्तराखंडच्या देहराडून येथे अलीकडेच “जंगल आणि वन्यजीव संवर्धनातील नागरिक विज्ञानाची भूमिका” या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. यात देशभरातील सुमारे ३० प्रतिनिधी सहभागी झाले होते. यात लोकमतचे संदीप बोडवे यांचाही सहभाग होता. 

शिबिरातील प्रमुख सत्रे व अनुभव:

नागरिक विज्ञानाची संकल्पना आणि व्यापक स्वरूपाची जाणीव, डेटा संकलन व नोंदणीचे प्रात्यक्षिक, तांत्रिक साधनांचा वापर, वन्यजीव संरक्षण कायदे व धोरणे, स्थानिक समुदायाशी संवाद, जैवविविधता निरीक्षण

का आहे आवश्यकता: मोठ्या प्रमाणावर डेटा संकलन....देशातील प्रत्येक भागातील हवामान, वन्यजीव, नदी-तलाव याबद्दल प्रचंड प्रमाणात माहिती हवी असते. शास्त्रज्ञ व सरकारी यंत्रणा एकट्याने हे करू शकत नाहीत. नागरिकांच्या सहभागामुळे डेटा संकलन झपाट्याने वाढते. स्थानिक ज्ञानाचे महत्त्व.... स्थानिक लोकांना आपल्या परिसराची खरी माहिती असते. पावसाच्या पद्धती, पक्ष्यांचे स्थलांतर, वनस्पतींचा ऋतुनुसार बदल – ही माहिती अमूल्य आहे. जनजागृती व जबाबदारीची जाणीव.... नागरिक विज्ञानात सहभागी झालेला प्रत्येक जण पर्यावरणाबद्दल अधिक जागरूक होतो. त्यातून सामूहिक जबाबदारीची भावना वाढीस लागते. धोरणनिर्मितीसाठी मदत.... मोठ्या प्रमाणात आणि दीर्घकालीन डेटा उपलब्ध झाल्यास सरकारला योग्य धोरणे आखता येतात. हवामान बदल, जंगल संवर्धन, शहरी नियोजन यासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरते. 

देहराडून प्रशिक्षण शिबिरातून संदेश: प्रशिक्षण आणि साधने आवश्यक: नागरिकांना मार्गदर्शन, तांत्रिक सहाय्य दिल्यास ते दर्जेदार डेटा गोळा करू शकतात. शैक्षणिक संस्थांचा सहभाग: शाळा, महाविद्यालयांतून नियमित उपक्रम राबवणे गरजेचे आहे. शासन व स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य: निधी, साधनसामग्री, प्रचार यासाठी मजबूत नेटवर्क आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग: मोबाईल अॅप्स, GPS, GIS नकाशे यांचा वापर अधिकाधिक करणे. ग्रामीण भागातील विशेष मोहीमा: गावोगाव कार्यशाळा, निसर्ग क्लब, युवक मंडळे यांच्या माध्यमातून जनजागृती.

ॲप किंवा साधनाचे नाव व उपयोगिता: इंडिया बायोडायव्हर्सिटी पोर्टल - सर्व प्रकारच्या सजीवांची नोंद, फोटो, ठिकाण (GPS) आणि माहिती अपलोड करा. आय-नॅचरलिस्ट - फोटोवरून प्रजाती ओळखा, स्मार्टफोन कॅमेऱ्याने फोटो काढा, ॲपमध्ये अपलोड करा. ▪️ई-बर्ड - पक्षीनिरीक्षण, गणना, पक्ष्याची संख्या, नावे, ठिकाण नोंदवा. मर्लिन बर्ड आयडी - पक्षी ओळखण्याचे साधन, फोटो/आवाज टाका, शक्य प्रजाती/नावे मिळवा. ▪️सीझनवॉच - झाडांच्या ऋतूबदलाची नोंद, एका विशिष्ट झाडावर सप्ताह/महिन्याने निरीक्षण करा. मायग्रंट वॉच- स्थलांतरित पक्ष्यांची माहिती, हिवाळ्यात/प्रवासात पक्षी दिसल्यास नोंद करा. ▪️फ्रॉग फाइंड- बेडूकाचे फोटो/आवाज ओळखणे विशेषतः पावसाळ्यात किंवा रात्री निरीक्षणात उपयुक्त. 

लक्षात ठेवा: प्रत्येक निरीक्षणाच्या वेळी फोटो किंवा ध्वनी स्पष्ट असावा. दोन्ही नोंदीसाठी ठिकाण (GPS), तारीख व वेळ आवश्यकपणे लिहा. समुदायातील इतरांनीही निरीक्षणे शेअर केली आहेत का, हे तपासा आणि चर्चेत भाग घ्या. दुर्मिळ किंवा संवेदनशील प्रजातीच्या ठिकाणाची माहिती गोपनीय ठेवता येते, ॲपमध्ये "गोपनीयता" पर्याय वापरावा. 

सहभाग कसा घ्यावा? आपल्या परिसरातील झाडे, पक्षी, प्राणी, नदी-तलाव याची निरीक्षणे नोंदवावीत. फोटो किंवा ध्वनीची नोंद घेऊन, माहिती योग्य ॲपमध्ये अपलोड करावी. शाळांच्या विज्ञान प्रकल्पात प्रत्यक्ष सहभाग घ्यावा व स्थानिक स्तरावरील जनजागृती मोहिमांमध्ये सहभाग घ्यावा. समुदायातील इतर नागरिक, विद्यार्थी व स्थानिक संस्था यांच्या गटामध्ये माहिती शेअर करावी.

सहभागाचे महत्वदेशभरातील विविध भागांतील माहिती मिळाल्यास वैज्ञानिक संशोधन व धोरणनिर्मितीत मदत होते. - स्थानिकांचे अनुभव आणि निरीक्षण हे अधिक अचूक असल्यामुळे डेटा आपोआप मूल्यवान ठरतो. - नागरिकांचा सहभाग वाढला की पर्यावरणाबद्दल जागरूकता आणि जबाबदारीची भावना बळकट होते. - मोठ्या प्रमाणावर व दीर्घकाळ उपलब्ध डेटा हवामान बदल, प्रदूषण नियंत्रण, जैवविविधता रक्षण यासाठी आवश्यक असतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Become citizen scientists: New movement for environment protection!

Web Summary : Citizen science empowers everyone to contribute to environmental research. Collect data on wildlife, climate, and pollution using apps. This collective effort aids scientists and policymakers in conservation.