शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक मच्छिमारांच्या साखळी उपोषणास राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 19:30 IST

malvan fishrman sindhudurg : एलईडी मासेमारीस बंदी असतानाही केंद्र शासनाच्या नाकर्तेपणामुळेच कारवाई होत नसून यामुळेच वाद निर्माण होत आहे. एलईडीसह अनधिकृतरीत्या होणार्‍या पर्ससीनच्या मासेमारीवर मत्स्य विभागाकडून कारवाई होत नसून अधिकार्‍यांची भूमिका संशयास्पद आहे. हे अधिकारी दबावाखाली वावरत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केला.

ठळक मुद्देपारंपरिक मच्छिमारांच्या साखळी उपोषणास राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली भेट पर्ससीन कारवाईबाबत मत्स्य विभागाची भूमिका संशयास्पद :अमित सामंत

मालवण : एलईडी मासेमारीस बंदी असतानाही केंद्र शासनाच्या नाकर्तेपणामुळेच कारवाई होत नसून यामुळेच वाद निर्माण होत आहे. एलईडीसह अनधिकृतरीत्या होणार्‍या पर्ससीनच्या मासेमारीवर मत्स्य विभागाकडून कारवाई होत नसून अधिकार्‍यांची भूमिका संशयास्पद आहे. हे अधिकारी दबावाखाली वावरत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केला.मालवण येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस राज्य सरचिटणीस व्हिक्टर डांटस, काका कुडाळकर, तालुकाध्यक्ष डॉ. विश्‍वास साठे, आगोस्तीन डिसोझा, भास्कर परब, नझीर शेख, शिवाजीराव घोगळे, उत्तम सराफदार, बाबू डायस, सुजन खोबरेकर, सलिम खान, अँथोनी फर्नांडिस, सदाफ खटखटे, रेजिना डिसोझा, सारीका डायस, प्रमोद कांडरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.पारंपरिक मच्छीमारांनी सहायक मत्स्यव्यवसाय कार्यालयासमोर छेडलेल्या साखळी उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सामंत म्हणाले, देशात एलईडी मासेमारीला पूर्णतः बंदी असताना त्यावर कारवाईस मत्स्यव्यवसाय विभागास कोणी अडविले आहे? पारंपरिक मच्छीमारांनी साखळी उपोषण छेडल्यानंतर आचर्‍यातील पर्ससीनच्या नौकेवर गुन्हा दाखल करण्यात आला. मच्छीमारांच्या ज्या मागण्या आहेत त्याचे पत्र मत्स्य आयुक्तांना देण्यास काहीही हरकत नाही.पारंपरिक मच्छीमारांच्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. मत्स्यव्यवसायचे अधिकारी एलईडी, पर्ससीनच्या नौकांवर कारवाईसाठी पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्याचे सांगत आहेत. आमचे गृहमंत्री असल्याने याप्रश्‍नी आम्ही त्यांचे लक्ष वेधू असे अमित सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :fishermanमच्छीमारMalvan beachमालवण समुद्र किनाराsindhudurgसिंधुदुर्ग