शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत ११ मार्चपासून नाट्य महोत्सव!, नाट्यरसिकांना पर्वणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 13:48 IST

नटसम्राट मच्छींद्र कांबळी स्मृती नाट्यमहोत्सवाचे आयोजन

कणकवली: वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ११ते १६ मार्च या कालावधीत प्रतिष्ठानच्या नाट्यमंदिरात नटसम्राट मच्छींद्र कांबळी स्मृती नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात नाट्यरसिकांना विविध विषयांवरील नाटके पाहता येणार असून त्यांच्यासाठी ही एक पर्वणीच आहे.११ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता व रात्री ९ .३० वाजता प्रदीप वैद्य लिखीत व दिग्दर्शित 'काजव्यांचा गाव ' हे नाटक सादर होईल . १२ मार्च रोजी रात्री ९ वाजता पियूष मिश्रा लिखीत व शंतनू पाटील दिग्दर्शित काफिला कोल्हापूरनिर्मित 'गगन दताना माज्या ' हे नाटक सादर होईल. १३ मार्च रोजी रात्री ९ वाजता धनंजय सरदेशपांडे लिखीत व रुपाली गोडंबे दिग्दर्शित 'फारचं टोचलयं' तर रात्री १०.३० वाजता राजेंद्र चव्हाण लिखीत मित्र शिरगावनिर्मित ' मनदेशी माणसे ' हे नाटक सादर होईल.१४ मार्च रात्री ९ वाजता मृणालिनी बनारसे लिखीत व विद्यानिधी बनारसे दिग्दर्शित ' डार्विन ' तर रात्री १०.३० वाजता आदिती व्यंकटेशन लिखीत व विद्यानिधी वनारसे दिग्दर्शित आयपारनिर्मित ' फॉल अगेन फ्लाय बेटर ' हे नाटक सादर होईल . १५ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता व रात्री ९.३० वाजता रामू रामनाथन लिखीत अतुल पेठे दिग्दर्शित नाटकघर पुणे निर्मित ' शब्दांच्या रोजनिशी ' हे नाटक सादर होईल. १६ मार्च रोजी रात्री ९ वाजता' दास्तान-ए-बडी बांका' हे नाटक सादर होईल.नाट्यरसिकांनी या नाट्यउत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन आचरेकर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ऍड. नारायण देसाई, कार्यवाह शरद सावंत यांनी केले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग