शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

cyclone : निसर्ग चक्रीवादळात जिल्ह्यात ४ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 15:05 IST

निसर्ग चक्रीवादळ सिंधुदुर्ग जिल्ह्यावर धडकले नाही, तरीही या वादळाचा तडाखा सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही बसला आहे. या चक्रीवादळात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. या चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका जिल्ह्यातील वीज वितरण विभागाला बसला आहे. या विभागाचे सुमारे ३ कोटी रुपये एवढे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात या वादळामुळे सार्वजनिक व खासगी मिळून तब्बल ४ कोटी १५ लाख २२ हजार ९४५ रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देनिसर्ग चक्रीवादळात जिल्ह्यात ४ कोटींचे नुकसानवीज वितरण कंपनीला सर्वाधिक ३ कोटींचा फटका, नुकसानीचे पंचनामे पूर्ण

सिंधुदुर्ग : निसर्ग चक्रीवादळसिंधुदुर्ग जिल्ह्यावर धडकले नाही, तरीही या वादळाचा तडाखा सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही बसला आहे. या चक्रीवादळात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. या चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका जिल्ह्यातील वीज वितरण विभागाला बसला आहे. या विभागाचे सुमारे ३ कोटी रुपये एवढे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात या वादळामुळे सार्वजनिक व खासगी मिळून तब्बल ४ कोटी १५ लाख २२ हजार ९४५ रुपयांचे नुकसान झाले आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशाच्या पश्चिम किनाऱ्याला निसर्ग या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला होता. हे वादळ कोकण किनारपट्टीवर आदळेल असा अंदाज होता. त्यामुळे गोव्यासह मुंबई पर्यंतच्या किनारपट्टीवर दक्षतेचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आवश्यक सर्व खबरदारी सर्व जिल्हा प्रशासनानी घेतली होती.या वादळाचा परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्यावरही होईल असा अंदाज होता. मात्र, हे चक्रीवादळ सरकत रायगडच्या दिशेने गेले आणि रायगड समुद्र किनाऱ्यावर आदळल्याने रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.सिंधुदुर्ग जिल्हा या चक्रीवादळाच्या तडाख्यातून वाचला असला तरीही या वादळाचा बराच परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्याला भोगावा लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही घरांची पडझड, विद्युत खांबांची पडझड, पाटबंधारे विभागाचे नुकसान, काजू कारखान्याचे नुकसान, झाडे उन्मळून पडणे असे प्रकार झाले. या निसर्ग चक्रीवादळाचे परिणाम आता हळूहळू समोर येऊ लागले आहेत. जिल्ह्यातील नुकसानीचे बऱ्यापैकी पंचनामे झाले आहेत.या नुकसानीमधे सर्वात जास्त विद्युत विभागाचे नुकसान झाले आहे. या विभागाचे सुमारे २ कोटी ८९ लाख ५३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर हे वादळ आणि पाऊस यामुळे जिल्ह्यातील बरीच घरे पूर्णत:, अंशत: कोसळली आहेत. यामुळे या सर्वांचे एकूण ३७ लाख १९ हजार ५०५ रुपये एवढे नुकसान झाले आहे.जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींचे नुकसान झाल्याने यापोटी ४२ हजार ४४० रुपयांचे, प्राथमिक आरोग्य केंद्राची पडझड होऊन ५ हजार, पाटबंधारे विभागाचे ६५ लाख रुपयांचे आणि काजू कारखान्यांचे २३ लाख रुपये एवढे नुकसान झाले आहे.नुकसानीची आकडेवारी वाढण्याची शक्यतानिसर्ग चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गात झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत आले आहेत. या निसर्ग चक्रीवादळामुळे खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या चक्रीवादळाचा परिणाम सर्वात जास्त विद्युत विभागावर झाला आहे.

जिल्ह्यात सोमवारपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एकूण ४ कोटी १५ लाख २२ हजार ९४५ रुपयांची नुकसानी झाली असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाच्यावतीने शासनास कळविण्यात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, ही आकडेवारी अजून वाढण्याची शक्यता आहे. अजून बºयाच विभागांची माहिती येणे बाकी आहे.

टॅग्स :cycloneचक्रीवादळsindhudurgसिंधुदुर्ग