शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
3
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
4
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
5
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
6
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
7
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
8
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
9
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
10
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
11
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
12
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
13
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
14
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
15
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
16
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
17
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
18
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
19
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
20
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : राष्ट्रवादीची बैठक भाजपच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 14:17 IST

विधानसभा निवडणुकीची धामधूम अंतिम टप्प्यात असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांमधील सेनेविषयीची नाराजी आता उघड होऊ लागली आहे. यातूनच येथील उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांच्या घरी चक्क राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचारार्थ रात्री बैठक घेण्यात आली. त्यामुळे सेना-भाजपमधील फूट काहीशी उघड झाली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादीची बैठक भाजपच्या घरातचिपळूण मतदारसंघ, अंतर्गत धुसफूस अजूनही धुमसतेय

चिपळूण : विधानसभा निवडणुकीची धामधूम अंतिम टप्प्यात असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांमधील सेनेविषयीची नाराजी आता उघड होऊ लागली आहे. यातूनच येथील उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांच्या घरी चक्क राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचारार्थ रात्री बैठक घेण्यात आली. त्यामुळे सेना-भाजपमधील फूट काहीशी उघड झाली आहे.येथील नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष म्हणून निशिकांत भोजने हे महत्त्वाची भूमिका बजावत असून, भाजपचे पदाधिकारी म्हणूनही ते कार्यरत आहेत. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत चिपळूण - संगमेश्वर मतदारसंघातून त्यांनी अपक्ष उमेदवारी लढवली होती.

सुमारे तीन हजाराहून अधिक मते त्यांनी वैयक्तिक स्वरूपात मिळवली होती. त्यांचा या मतदारसंघात आजही तितकाच जनसंपर्क आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांचा त्यांनी सुरू केलेला प्रचार तितकाच परिणामकारक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील शिवसेना - भाजप यांच्यातील कटुता संपल्याचे सांगितले जात असले तरी अंतर्गत धुसफूस अजूनही कायम असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम निवडणुकीत दिसण्याची चिन्हे आहेत.जिल्ह्यातील पाचही जागांवर भाजपचा एकही उमेदवार नसल्याने पक्षात काहीशी नाराजी होती. मात्र, आजपर्यंत सेनेच्या विरोधात कोणीही भूमिका घेतलेली नसताना केवळ उपनगराध्यक्ष भोजने हे एकमेव असे पदाधिकारी आहेत. त्यामुळे याविषयी भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे. 

 

गेल्या दोन निवडणुकांमध्ये सेनेचे उमेदवार सदानंद चव्हाण यांचे प्रामाणिकपणे काम केले; मात्र त्यांनी आपल्या कामाची जराही दखल घेतली नाही. त्यातच आता भाजपला एकही उमेदवार दिला नाही. त्यामुळे आता आम्हालाही गृहीत धरून सेना काम करताना दिसत आहे. त्यामुळे आपले अस्तित्व काय आहे, हे दाखवून देण्यासाठी आपण ही भूमिका घेतली.- निशिकांत भोजने,उपनगराध्यक्ष चिपळूण

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाratnagiri-acरत्नागिरी