शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नाधवडे धरणाजवळ पट्टेरी वाघाच्या दर्शनाच्या निव्वळ अफवाच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2018 21:07 IST

नाधवडे धरणाजवळ शनिवारी रात्री पट्टेरी वाघाच्या दर्शनाची छायाचित्रे व्हॉट्सअॅपवर फिरू लागताच कुतूहल तर निर्माण झालेच.

वैभववाडी(सिंधुदुर्ग): नाधवडे धरणाजवळ शनिवारी रात्री पट्टेरी वाघाच्या दर्शनाची छायाचित्रे व्हॉट्सअॅपवर फिरू लागताच कुतूहल तर निर्माण झालेच. परंतु वनविभागासह परिसरातील नागरिकांची तारांबळही उडाली. मात्र, वनविभागाने त्याबाबत खात्री केल्यानंतर ती अफवा असल्याचे स्पष्ट होताच सा- यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

व्हॉट्सअॅपवर मध्यरात्रीपासून तळेरे-वैभववाडी-कोल्हापूर मार्गावर नाधवडे धरणासमोर पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याची 4 छायाचित्रे जोरात फिरवली जात होती. त्यामुळे दिवस उजाडताच वाघाच्या चर्चेने धुमाकूळ माजवला. ओळखी पाळखीचा प्रत्येकजण ती छायाचित्रे व्हॉट्सअॅपवर शेअर करीत होता. 'तळेरे वैभववाडी मार्गावर रात्री 11.15 वा वाघ दिसला. प्रवाशांनी खबरदारी घ्या' हा मेसेजही छायाचित्रांसोबत येत होता. त्यामुळे काहीसे कुतूहल आणि भीतीही पसरली होती. मात्र, छायाचित्रे काढणा-याचा मोबाईल नंबर अनेकांना विचारूनही दुपारपर्यंत तो कोणीच देऊ शकला नाही. त्यावरून ती अफवा असल्याची जाणीव झाली होती.या घटनेबाबत वनपाल चंद्रकांत देशमुख यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी वनरक्षक प्रकाश पाटील यांना नाधवडेत पाठवून खात्री करण्यास सांगितले. त्यानुसार धरण परिसरात ते फिरले मात्र, पट्टेरी वाघच काय पण बिबट्यांच्याही पाऊलखुणा तेथे आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळेच वनविभागानेही सुटकेचा निःश्वास टाकला. हीच छायाचित्रे गगनबावडा-कोल्हापूर मार्गावर वाघाचे दर्शन म्हणून दुपारनंतर काही व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये फिरवली जात होती. त्यामुळे संतापही व्यक्त होत होता. दरम्यान, वनखात्याच्या आतापर्यंतच्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात पट्टेरी वाघांच्या अस्तित्वाबाबत कोणताही महत्त्वाचा पुरावा आढळून आलेला नाही. तो मोठ्या सावजाची शिकर करतो. तश्या प्रकारचा पाणी जंगली प्राण्याने मारल्याच्या घटनेचीही नोंद सिंधुदुर्ग वनविभागाकडे नाही, असे वनपाल चंद्रकांत देशमुख यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Tigerवाघ