रत्नागिरी/कणकवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी कोकणच्या दौऱ्यावर येत असून, त्यांची रत्नागिरी आणि कासार्डे (कणकवली) येथे जाहीर सभा होणार आहे. मोदी यांच्या सभेनेच कोकणातील प्रचाराची सांगता होत असल्याने ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत सर्वात मोठी लढत शिवसेना आणि भाजपमध्येच होत असल्याने मोदी यांच्या सभेला विशेष महत्त्व आले आहे. रत्नागिरीतील सभा सकाळी ११ वाजता उद्यमनगर येथील चंपक मैदानावर होत असून, कासार्डे माळावरील सभा दुपारी १२ वाजता होणार आहे. दोन्ही ठिकाणी भव्य मंडप उभारला असून, प्रचंड पोलीस बंदोबस्तही तैनात केला आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून राहिलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर प्रचार सभा उद्या (१३ आॅक्टोबर) रत्नागिरी येथील चंपक मैदानावर होत आहे. सुमारे २०० कमांडोजही दाखल झाले आहेत. त्यामुळे रत्नागिरीची सभा होणार की नाही याबाबतचा संभ्रम संपुष्टात आला आहे.रत्नागिरीप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मोदी सभा घेणार आहेत. कणकवली तालुक्यातील कासार्डे कासार्डे येथे सुमारे २ लाख स्क्वेअर फूट जागेवर सभेचे आयोजन केले आहे. पाऊस आणि उन्हापासून संरक्षणासाठी भव्य मंडप उभारला आहे. सभेसाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था आहे. कर्नाटक आणि गुजरातच्या पोलिसांनी यापूर्वीच सभास्थळाचा ताबा घेतला आहे. (प्रतिनिधी)सिंधुदुर्गात प्रचारासाठी दुसरे पंतप्रधानसिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुकीच्या प्रचारासाठी येणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत. यापूर्वी १९९० च्या विधानसभा निवडणुकीत जनता दलाचे उमेदवार सि.स.सावंत यांच्या प्रचारासाठी तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांची कणकवलीत प्रचार सभा झाली होती.
नरेंद्र मोदी आज कोकण दौऱ्यावर
By admin | Updated: October 12, 2014 23:31 IST