शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
9
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
10
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
11
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
12
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
13
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
14
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
15
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
16
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
17
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
18
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
19
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
20
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

पुण्याच्या कवयित्री कविता शिर्के यांना नारायण सुर्वे पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 11:14 IST

Narayan Surve Award Culture Sindhudurg- समाज साहित्य संघटना आणि कवी लेखक संघटना सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणारा कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार अजय कांडर यांच्या हस्ते पुणे शिरुर येथील कवयित्री कविता शिर्के यांना शनिवारी प्रदान करण्यात आला .

ठळक मुद्देपुण्याच्या कवयित्री कविता शिर्के यांना नारायण सुर्वे पुरस्कारसोशल मिडियाच्या आक्रमणापासून कवींनी दूर रहायला हवे -अजय कांडर

कणकवली : मराठीत खूप चांगली कविता लिहिली जात आहे. परंतु गुणवत्तेने लिहिणारे कवी आजच्या बाजारू व्यवस्थेपासून दूर राहून लिहित आहेत . त्यांना नव्या कवींनी जोडून घ्यायला हवे . सोशल मीडियाच्या काळात प्रसिद्धीपासून दूर राहू शकतो , तोच चांगली कविता लिहू शकतो . त्यामुळे सोशल मिडियाच्या आक्रमणापासून कवींनी दूर रहायला हवे, असे प्रतिपादन कवी अजय कांडर यांनी केले .समाज साहित्य संघटना आणि कवी लेखक संघटना सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणारा कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार अजय कांडर यांच्या हस्ते पुणे शिरुर येथील कवयित्री कविता शिर्के यांना शनिवारी प्रदान करण्यात आला .

कलमठ आदर्श रेसिडेन्सी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात कांडर बोलत होते. ते म्हणाले, मराठी साहित्यात आज चांगली कविता लिहिली जात आहे . बहिणाबाई ते आजच्या शरयू आसोलकर यांच्यापर्यंत कवयित्रींनी कविता समृद्ध केली . हाच गुणवत्तेचा धागा पकडून कवयित्री कविता शिर्के कविता लेखन करत आहेत . त्यामुळे त्यांना समाज साहित्य संघटना , सिंधुदुर्गतर्फे कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्काराने गौरवण्यात आले . समाज साहित्य संघटना यापुढील काळात अशा कवींची दखल घेऊन त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करेल .कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कदम यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या कार्यक्रमाला समाज साहित्य संघटनेचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, संघटनेचे पदाधिकारी सूर्यकांत चव्हाण, मनिषा पाटील , किशोर वालावलकर , नीलम यादव , प्रमिता तांबे , मुल्ला , ॲड . मेघना सावंत आदी उपस्थित होत्या .कविता शिर्के म्हणाल्या, आपण माणूस आधुनिक झाला म्हणतो. पण , आपले विचार मात्र आधुनिक झाले नाहीत . त्यामुळे अनेक स्त्रियांची बरीच ऊर्जा पारंपरिक मानसिकतेत व्यर्थ होत जाते . एक सजग कवयित्री म्हणून मला नेहमी वाटत राहते की , स्त्रियांची अशी ऊर्जा वाया जाता नये. कोकणच्या मातीला साहित्याचा दर्प आहे . इथली माणसे , इथला निसर्ग माणसांना आपल्या प्रेमात पाडतो.

इथल्या भाषेतील गोडवा माणसाला माणूसपणावर विश्वास ठेवायला भाग पाडतो . आयुष्यात आपण कोणाच्या संगतीत राहतो व आपण काय वाचतो या दोनच गोष्टी आपले भविष्य ठरवत असतात . कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कार देऊन तुम्ही मला कोकणच्या मातीशी जोडून घेतले . तुमच्या प्रत्येकाच्या मनातील आत्मियता पाहून मला वाटते हा पुरस्कार म्हणजे जणू माझ्या माहेरी माझी खणा नारळानेच तुम्ही ओटी भरलात .मातोंडकर म्हणाले , सिंधुदुर्गात आज अनेक साहित्य सांस्कृतिक चळवळी कार्यरत आहेत . अशावेळी अजूनही एक समाज साहित्य संघटना कशाला ? असा प्रश्न सहज पडेल . परंतु आताच्या काळात माणसाला समृद्ध करण्यासाठी अनेक साहित्यिक चळवळी निर्माण होणे गरजेचे आहे . या चळवळी समाजाला जोडल्या गेल्या पाहिजेत . त्यामुळे समाज साहित्य संघटना स्थापन करण्यात आली आहे .

या पहिल्याच कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्य रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला कविता शिर्के यांच्यासारख्या निष्ठेने कविता लिहिणाऱ्या कवयित्रीला नारायण सुर्वे यांच्या नावाचा पुरस्कार देण्यात आला. याचे या संस्थेचा अध्यक्ष म्हणून समाधान वाटत आहे. प्रास्ताविक नीलम यादव यांनी केले . सूत्रसंचालन प्रमिता तांबे यांनी तर आभार मनिषा पाटील यांनी मानले . 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकsindhudurgसिंधुदुर्ग