शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पतीसाठी गृहमंत्री, पित्यासाठी कन्या मैदानात!; रत्नागिरी-सिंधुदुर्गात नीलम राणे, रूची राऊत यांचा प्रचाराचा धडाका

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 30, 2024 16:13 IST

सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा सध्या जोरात दणाणत आहेत. रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ ...

सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा सध्या जोरात दणाणत आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी नीलम राणे त्यांना उमेदवारी जाहीर होण्याआधीपासूनच म्हणजे ५ एप्रिलपासून जोरदार प्रचार रिंगणात उतरल्या आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी त्यांचा मुलगा गितेश आणि मुलगी रूची प्रचारात उतरली आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघामध्ये एकूण ९ उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघामध्ये दुहेरी लढतीचे चित्र आहे. महायुतीकडून भाजपाचे नारायण राणे तर महाविकास आघाडीतून उद्धवसेनेचे विनायक राऊत यांच्यातच खरी लढत आहे. दोन्ही उमेदवारांसह कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंबीयदेखील या राजकीय आखाड्यात प्रचारासाठी उतरले आहेत.

गृहमंत्र्यांचा दहा दहा तास प्रचारनीलम नारायण राणे :महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे गृहिणी आहेत. यापूर्वी निलेश राणे यांच्यासाठी त्यांनी प्रचार केला आहे.  सध्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला पदाधिकाऱ्यांना घेऊन डोअर टू डोअर भेटी देत आहेत, मेळावे घेत आहेत. तसेच गावागावात फिरून महिलांशी संवाद साधत आहेत.

रूची विनायक राऊत:खासदार विनायक राऊत यांची मुलगी रूची राऊत आणि मुलगा प्रितेश राऊत दोघेही प्रचारात मग्न आहेत. रूची राऊत या निवडणुकीच्या अगोदरपासूनच विविध ठिकाणी उध्दवसेनेच्या व्यासपीठावर दिसत होत्या.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४