शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मतदार संघात ठाण मांडून राणेंचा विरोधकांवर प्रहार, प्रचार सभांचा धुरळा

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 11, 2024 19:11 IST

महायुतीचा उमेदवार जाहीर होईना 

सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. १२ एप्रिलपासून निवडणूक प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. मात्र, गेल्या काही निवडणुकांच्या इतिहासात पहिल्यांदाच मतदार संघातील नोटीफिकेशनची तारीख आली तरी अद्याप भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या महायुतीचा अजूनही उमेदवार कोण असणार ? हे जाहीर झालेले नाही. भाजप आणि शिंदेसेना यांच्यामध्ये या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे.

शिंदेसेना आणि भाजपा दोन्ही बाजूंना शांत करून एकच उमेदवार जाहीर करण्याचे कठीण आव्हान महायुतीच्या नेतेमंडळींसमोर आहे. मात्र, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मतदार संघात प्रचारसभांचा धडाका लावला आहे. भाजपाकडून या मतदार संघात मंत्री राणे यांनी महायुतीच्या प्रचारासाठी गेले आठ दिवस मतदार संघात ठाण मांडली असून कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर दिवसभर पदाधिकारी, कार्यकर्त्यांची रेलचेल पहायला मिळत आहे.राणे यांनी महायुतीचे तालुकानिहाय मेळावे घेण्यास सुरूवात केली असून उमेदवार कोणीही असा विद्यमान खासदार विनायक राऊत यांचा पराभव करण्यासाठी कंबर कसली आहे. राणे सध्या दिवसभरात तीन ते चार जाहीर सभा, बैठका घेत आहेत. आणि या प्रचारसभांमध्ये आपल्या विरोधकांवर जोरदार प्रहार करीत आहेत.

गेली ३० राज्याच्या राजकारणात सतत चर्चेत राहणारे आणि बेधडक, सडेतोड वक्ते म्हणून नारायण राणेंची ओळख आहे. त्यांनी राज्याच्या मंत्रीमंडळात विविध खाती सांभाळतानाच तळकोकणातील पहिला मुख्यमंत्री होण्याचा मानदेखील मिळविला आहे. मुख्यमंत्री पदाच्या अल्पावधीच्या कालावधीतही त्यांनी धडाकेबाज काम केले आहे. या कामाची स्तुती राज्यातील अनेक नेत्यांनी वेळोवेळी केली आहे. विधानसभेत मंत्री म्हणूनही आणि विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे निवडणुका लढविण्याचे वेगळे कसब त्यांच्याकडे आहे. आपल्या अनुभवाचा पुरेपुर उपयोग करून घेत त्यांनी यावेळेस कोकणातील महायुतीचा पर्यायाने भाजपाच पहिला खासदार निवडून आणण्याचा चंगच बांधला आहे.

जुने सहकारी लागले कामालानारायण राणे १९९० साली तत्कालिन मालवण कणकवली विधानसभा मतदार संघातून निवडून येत जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर सलग सहा निवडणुकांमध्ये त्यांचा विजय झाला होता. त्यावेळपासून राणे यांच्या समवेत कार्यरत असलेले त्यांचे सहकारी मालवणचे दत्ता सामंत, अशोक सावंत यांच्यासारखे जुने सहकारी जोमाने प्रचार कार्यात उतरले आहेत.

मोदींची छबी, रोजगाराची गॅरंटीराणेंकडून प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला जात आहे. त्याचबरोबर विद्यमान खासदारांनी कोणतेही काम केले नाही तर आणलेल्या प्रकल्पांना आणि कामांना आडकाठी आणण्याचे काम केल्याचा आरोपही ते करीत आहेत. आगामी काळात महायुती सोबत राहिल्यास आपण रोजगाराची गॅरंटी देत असल्याची ग्वाहीदेखील दिली जात आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे