शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

सावरकरांच्या अभिवादनाचा प्रस्ताव न घेणाऱ्या सरकारचा नारायण राणेकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 18:33 IST

कुडाळ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा प्रस्ताव विधानसभेत घेतला गेला नाही. उलट सभागृहात गदारोळ करण्यात आला. ...

ठळक मुद्देसावरकरांच्या अभिवादनाचा प्रस्ताव न घेणाऱ्या सरकारचा नारायण राणेकडून निषेधमुख्यमंत्र्यांना थंडी वाजत होती की लाज?

कुडाळ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा प्रस्ताव विधानसभेत घेतला गेला नाही. उलट सभागृहात गदारोळ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थंडी लागत होती की, त्यांना लाज वाटत होती? असा खडा सवाल माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व त्याग करणाऱ्या सावरकरांच्या अभिवादनाचा प्रस्ताव न घेणाऱ्या सरकारचा त्यांनी यावेळी जाहीर निषेध केला.लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, डॉ. मिलिंद कुलकर्णी तसेच भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.खासदार राणे म्हणाले, सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला. दोन वेळा जन्मठेपेची शिक्षाही भोगली. अनेक वर्षे तुरुंगवासही भोगला. अशा राष्ट्रपुरुषाच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादनाचा प्रस्ताव विधानसभेत आमच्या भाजपाच्या आमदारांनी मांडला. मात्र, नियमात बसत नसल्याचे कारण देत हा प्रस्ताव विधानसभेत येऊ दिला नाही. अशावेळी मुख्यमंत्री ठाकरे काय करीत होते? त्यांना थंडी वाजत होती की, लाज वाटत होती? सभागृहात सावरकरांच्या योगदानाएवढे कोणाचे योगदान आहे का? असे सवाल राणेंनी उपस्थित केले. खरेतर सभागृहात अनेक नियमात नसणाऱ्या अनेक चांगल्या गोष्टींवर यापूर्वी अनेकदा चर्चा करण्यात आली. सावरकर यांच्याही अभिवादनाचा ठराव घेतला पाहिजे होता, असे मत त्यांनी व्यक्त केले.मात्र शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्हीही पक्ष एकत्र आले ते राज्याच्या भल्यासाठी नाहीतर केवळ सत्तेसाठी व पैसे लाटण्यासाठी आले आहेत. यांना राष्ट्रपुरुषांबद्दल कोणतीही आस्था नाही, अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली.केवळ मासे कसे खायचे याची माहिती असणाऱ्या मत्स्यमंत्र्यांना मच्छिमारांचे प्रश्न, मासेमारी याबाबतचे प्रश्न माहीत नाहीत आणि ते मत्स्य दुष्काळ नाही असे जाहीर करतात, हे अत्यंत चुकीचे असून येथील मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.मागील साडेसोळा कोटी रुपयांची नुकसान भरपाई अजूनही हे सरकार मच्छिमारांना देऊ शकले नाहीत. मच्छिमारांचे प्रश्न या सरकारला माहीत नाहीत. मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे सरकारने केले आहे. आता मत्स्यदुष्काळ जाहीर करत नाही तोपर्यंत विरोधीपक्ष शांत बसणार नाही, असा इशाराही राणेंनी दिला.उद्धव ठाकरे यांची कर्जमाफीची घोषणा फसवीशेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असे ठणकावून सांगणारे मुख्यमंत्री ठाकरे कर्जमाफीची फक्त घोषणा करून शांत बसले आहेत. तर शेतकरी कर्जमाफी कधी मिळणार याची पाहताहेत वाट पाहत आहेत. पण उद्धव ठाकरे यांची कर्जमाफीची घोषणा फसवी आहे.राज्याची तिजोरी रिकामी असताना पर्यटन मंत्री निधी देणार असल्याची घोषणा कशाच्या आधारे करतात? घोषणा करण्यापूर्वी त्यांनी अर्थमंत्र्यांना तरी विचारले का? असाही सवाल राणेंनी उपस्थित करीत हे सरकार व ठाकरे काहीच करू शकत नाहीत, असा टोलाही लगावला.आता विमानतळ १ मे रोजी सुरू होतो का ते पाहणार आहे. जिल्ह्यातील प्रकल्प, विकासकामे बंदावस्थेत असून गेल्या पाच वर्षात खासदार विनायक राऊत यांनी एकही विकासकाम केले नाही. उलट ते ठेकेदारांजवळ पैसे मागत आहेत. म्हणूनच ठेकेदार पळवून जात असून राऊत ज्या ठेकेदारांजवळ पैसे मागताहेत त्याची यादी लवकरच जाहीर करणार असल्याचा इशारा राणेंनी राऊत यांना दिला.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेsindhudurgसिंधुदुर्गVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर