शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Nagaran Manjule: ...तर इतिहास तुमची नोंद आग विझवणारा म्हणून घेईल, नागराज अण्णाने स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 10:30 IST

सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे : सावंतवाडीत जनवादी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

सिंधुदुर्ग/सावंतवाडी : माणसा माणसातील संवाद तुटला की गैरसमज निर्माण होत असतात. जर हे गैरसमज थांबवायचे असेल तर बोलत राहा, आग लागली तर घागर घेऊन आगीवर पाणी मारुन ती विझवा. कारण, इतिहास तुमची नोंद आग विझवणारा म्हणून घेईल, पेटवणारे होऊ नका असे मत प्रसिद्ध सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सध्याच्या राजकीय परस्थीतीवर माडले. मंजुळे यांनी कोणाचेही नाव न घेता आपले विचार मांडले.

सावंतवाडीत रविवार पासून येथील आरपीडी हायस्कूलच्या गुरूवर्य सत्यशोधक कृष्णाजी अर्जुन केळुसकर संमेलन नगरीत जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाला सुरुवात झाली. या संमेलनाचे अनोख्या पध्दतीने उद्घाटन सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी संमेलनाध्यक्षा संध्या नरे-पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष संजय वेतुरेकर, काँग्रेस नेते विकास सावंत किशोर जाधव, सुबोध मोरे, चंद्रकांत जाधव, आदि उपस्थित होते.

पुढे बोलताना मंजुळे म्हणाले, समाजातील संवाद संपत चालला असताना अशी संमेलन झाल्याने त्यातून एक उर्जा मिळत असते. मी प्रत्येक संमेलनाला मुद्दामहून जात असतो. यातून संवाद वाढत जात असतो आपापसातील संवाद संपला की गैरसमज निर्माण होतो. त्यामुळे वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांनी बोलत राहणे गरजेचे आहे. माणसातील माणूसपण टिकवता आले पाहीजे. केशवसुतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या सावंतवाडीत आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आला आहे. या ठिकाणावरुन बर्‍याचदा गेलो, पण साहीत्य संमेलनाच्या निमित्ताने सावंतवाडीसाठी येण्याचे भाग्य लाभले, असेही मंजुळे यांनी यावेळी म्हटले. केशवसूताच्या अनेक कविता वाचल्या पण त्यांनी ज्ञानदान केलेल्या संस्थेत येण्याचे भाग्य लाभले असे म्हणत अनेक रत्नाच्या पदस्पर्शाने सावंतवाडीची भूमी पुनीत झाली आहे. याठिकाणी साहीत्य संमेलनाच्या निमित्ताने आल्यानंतर एक वेगळे अनुभव आले. 

संमेलनाध्यक्षा सध्या नरे-पवार यांनी सध्याच्या राजकीय परस्थीतीवर भाष्य करताना या व्यवस्थेला सर्वसामान्य कंटाळला असून, आपल्या विचारांचे नाही ते नास्तिक असल्याचे ठरवले जात आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अजान विरोधात हनुमान चालिसा म्हणायला सांगितली, वेद मंत्र का नाही असा सवाल करत त्यांना आता सर्वत्र तेढ निर्माण करायचा आहे. त्यांचे स्क्रिप्ट कोठून येते ते सर्वानाच माहित आहे, असे म्हणत प्रसारमाध्यमांनी एक किल्ली न बनता सर्वसमावेशक बनले पाहिजे असेही नरे-पवार यांनी म्हटले.

दरम्यान, या निमित्ताने स्वागताध्यक्ष संजय वेतुरेकर यांच्यासह लेखक चंद्रकांत जाधव, सुबोध मोरे, किशोर जाधव, विकास सावंत यांनी विचार मांडले संमेलनाचे प्रास्ताविक संपत देसाई यांनी केले तर आभार मधुकर मातोंडकर यांनी माडले आजरा येथील प्रा.नवनाथ शिंदे, सिध्दार्थ देवधेकर, दुर्गादास गावंडे यांचा दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :Nagraj Manjuleनागराज मंजुळेsindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडी