शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
3
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
5
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
6
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
7
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
8
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
9
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
11
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
12
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
13
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
14
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
15
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
16
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
17
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
18
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
19
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
20
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?

नेता आमचा लय पावरफुल्ल, वैभववाडीत अपक्ष विजयी उमेदवाराची दणक्यात मिरवणूक; जेसीबीतून गुलाल-पुष्पवृष्टीची उधळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 14:34 IST

उमेदवारीबाबत समझोता होऊ न शकल्याने आमदार नीतेश राणेंनी दोघांनाही अपक्ष लढण्यास सांगितले होते. त्यामुळे या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांच्या लढतीकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

प्रकाश काळेवैभववाडी(सिंधुदुर्ग): वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीत अपक्ष निवडून आलेल्या नगरसेवकाने विजयी मिरवणूक काढली. यावेळी समर्थकांनी रोहन जयेंद्र रावराणे यांच्यावर चक्क जेसीबीतून गुलाल उधळत पुष्पवृष्टी केली. सत्ता राखलेल्या भाजपपेक्षा पुरस्कृत असलेल्या रोहन रावराणे यांच्या मिरवणूकीची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत होती. 'नेता आमचा लय पावरफुल्ल' या डीजेच्या गाण्याने जयेंद्र रावराणेंच्या निवडणुकीच्या रणनितीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले.   वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीत १७ पैकी ९ जागा जिंकून भाजपने सत्ता राखली. त्यानंतर शहरातून घोषणा देत विजयी उमेदवारांची मिरवणूक काढली. भाजपची विजयी मिरवणूक बाजारपेठेत पोहोचताच भाजप पुरस्कृत अपक्ष निवडून आलेल्या रोहन रावराणेंची डीजेच्या दणक्यातील मिरवणूक संभाजी चौकात दाखल झाली. त्यामुळे बाजारपेठेतील सर्वांच्या नजरा रावराणेंच्या मिरवणुकीकडे वळल्या होत्या. मिरवणुकीतील 'कटाऊट्स'ची चर्चासंताजी अरविंद रावराणे आणि रोहन जयेंद्र रावराणे यांच्यात प्रभाग ८ च्या उमेदवारीबाबत समझोता होऊ न शकल्याने आमदार नीतेश राणेंनी दोघांनाही अपक्ष लढण्यास सांगितले होते. त्यामुळे या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांच्या लढतीकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या अटीतटीच्या लढतीत रोहन रावराणेंनी बाजी मारली. विशेष म्हणजे निकाल जाहीर झाल्यावर जेमतेम पाऊण तासात त्यांची मिरवणूक निघाली. या मिरवणूकीत जेसीबीतून उधळलेल्या गुलालापेक्षा निकालाआधी मिरवणूकीसाठी सज्ज असलेल्या आभाराच्या मजकुराच्या कटाऊट्समुळे जयेंद्र रावराणे यांना रोहनच्या विषयाबद्दल असलेल्या 'काॅन्फिडन्स'ची जोरदार चर्चा रंगली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२vaibhavwadiवैभववाडी