शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
3
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
4
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
5
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
6
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
7
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
8
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
9
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
10
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
11
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
12
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
13
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
14
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
15
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
16
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
17
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
18
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
19
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
20
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस

नवीन शाळा बांधकाम यादीत नाद भोळेवाडी शाळेचे नावच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 16:41 IST

School EducationSector Sindhudurg : देवगड तालुक्यातील नाद भोळेवाडी शाळा निर्लेखित झाली असूनही नवीन शाळा बांधकाम यादीत या शाळेचे नाव नसल्याची बाब जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर यांनी बांधकाम समिती सभेत उघड केली. तसेच शिक्षण विभागाने प्राधान्यक्रम ठरवून दिलेल्या यादीत या शाळेचे नाव होते. मात्र, सभापती दालनातून जेव्हा यादी बाहेर पडली तेव्हा या शाळेचे नाव वगळण्यात आल्याचा आरोपही नारकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देनवीन शाळा बांधकाम यादीत नाद भोळेवाडी शाळेचे नावच नाही प्रदीप नारकर यांनी माहिती केली उघड

ओरोस : देवगड तालुक्यातील नाद भोळेवाडी शाळा निर्लेखित झाली असूनही नवीन शाळा बांधकाम यादीत या शाळेचे नाव नसल्याची बाब जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर यांनी बांधकाम समिती सभेत उघड केली. तसेच शिक्षण विभागाने प्राधान्यक्रम ठरवून दिलेल्या यादीत या शाळेचे नाव होते. मात्र, सभापती दालनातून जेव्हा यादी बाहेर पडली तेव्हा या शाळेचे नाव वगळण्यात आल्याचा आरोपही नारकर यांनी केला आहे.माझ्यावर अन्याय होतो ते मी सहन करतो. मात्र, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आपण सहन करणार नसल्याचे सांगत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थी व पालकांसह जिल्हा परिषदसमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही नारकर यांनी बांधकाम समिती सभेत दिला.जिल्हा परिषद बांधकाम समितीची मासिक सर्वसाधारण सभा येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सचिव तथा बांधकाम कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, समिती सदस्य जेरोन फर्नांडिस, प्रदीप नारकर, राजेश कविटकर, रेश्मा सावंत, श्रीया सावंत आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या शाळांची दुरुस्ती व नवीन वर्गखोल्या बांधण्यासाठीची यादी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून निश्चित करून अंतिम मान्यतेसाठी पालकमंत्र्यांच्याकडे  पाठविण्यात येते. देवगड तालुक्यातील नाद भोळेवाडी शाळा पूर्णतः नादुरूस्त झाल्याने तिचे निर्लेखन करून नवीन शाळा बांधकाम व्हावे यासाठी शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसार शिक्षण विभागाकडून जिल्ह्याची यादी तयार करण्यात आली. त्या यादीत या शाळेचे नाव समाविष्ट होते.

मात्र, आता मंजूर यादीत या शाळेचा समावेश नसल्याचे सदस्य प्रदीप नारकर यांनी सांगत शाळा बांधकाम न केल्यास येथील विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर यादी पालकमंत्र्यांनी मंजूर केली असून ती मंजुरीच्या वेळी आपण पालकमंत्र्यांना सांगून हे काम मंजूर करून घेतले पाहिजे होते, असे जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी सांगितले.उपोषण छेडणारशिक्षण विभागाने तयार केलेल्या यादीत नाद भोळेवाडी शाळेचा समावेश होता. मात्र, शिक्षण सभापती यांच्या दालनातून यादी बाहेर आली तेव्हा या शाळेचे नाव वगळण्यात आले असल्याचा आरोप सदस्य नारकर यांनी केला. जिल्हा परिषदेमध्ये आपल्यावर अनेक कामांमध्ये अन्याय केला जात आहे. मात्र, आता आपले ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्याय आपण सहन करणार नाही. विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदेसमोर उपोषण छेडणार असल्याचा इशाराही नारकर यांनी दिला आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाsindhudurgसिंधुदुर्ग