शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नॅक'चा आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाला 'अ' दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 17:05 IST

Education Sector college sindhudurg- शैक्षणिक दर्जा, दर्जेदार सुविधा, तंत्रज्ञान आणि महाविद्यालयामार्फत राबविले गेलेले समाजोपयोगी उपक्रम यांसह विविध घटकांचे मुल्यमापन करुन 'नॅक' समितीने महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबई संचलित येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाला 'अ' दर्जा दिला आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे यांनी दिली.

ठळक मुद्देनॅक'चा आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाला 'अ' दर्जा सी. एस. काकडे यांची माहीती; समितीकडून झाले होते मुल्यमापन

वैभववाडी: शैक्षणिक दर्जा, दर्जेदार सुविधा, तंत्रज्ञान आणि महाविद्यालयामार्फत राबविले गेलेले समाजोपयोगी उपक्रम यांसह विविध घटकांचे मुल्यमापन करुन 'नॅक' समितीने महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबई संचलित येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाला 'अ' दर्जा दिला आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे यांनी दिली.डॉ. काकडे यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली. यावेळी संस्थेच्या स्थानिय समितीचे अध्यक्ष सज्जन रावराणे, संचालक शैलेंद्र रावराणे, प्रा. वंदना काकडे, प्रा.आनंद कांबळे, अधिक्षक संजय रावराणे आदी उपस्थित होते.काकडे म्हणाले, २६ व २७ फेब्रुवारीला 'नॅक'च्या त्रिसदस्यीय समितीने महाविद्यालयात मुल्यमापन केले. त्या समितीत बिहारच्या डॉ. सी. व्ही रमण विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. आर. के पांडे, सिक्कीम विद्यापीठाचे प्रा. डॉ. सुधांशु महापात्रा, उत्तराखंड येथील पी.जी. कॉलेजचे प्राचार्य डॉ. विनय बोराई यांचा समावेश होता. यापुर्वी २००४ मध्ये 'सी' ग्रेड, २०१२ मध्ये 'बी' प्राप्त झाली होती. आता २०१३ ते २०१९ या कालावधीतील कामांचे मुल्यमापन समितीने केले.काकडे म्हणाले,'महाविद्यालय ग्रामीण भागात असुनही प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी 'नॅक'च्या नवीन प्रणालीला चांगल्या पध्दतीने सामोरे केले. याशिवाय संस्थेचे अध्यक्ष विनोद तावडे आणि संचालक मंडळाने यांनी देखील चांगले सहकार्य केले. सांघिक कामामुळेच 'ए' ग्रेड प्राप्त झाली असे त्यांनी सांगितले.आता लक्ष 'ए प्लस'चेमहाविद्यालयाला 'ए' ग्रेड प्राप्त झाली असुन ही आमच्यासाठी आनंददायी गोष्ट आहे. परंतु, ही ग्रेड टिकविण्यासोबत आता आम्ही अधिक जोमाने काम करुन 'ए प्लस' मिळविण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे मत प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालयvaibhavwadiवैभववाडीsindhudurgसिंधुदुर्ग