शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडून परस्पर बदल्या, बढत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 15:57 IST

Forest Department Sindhudurg- कणकवली वनक्षेत्रपाल यांंना परस्पर नेमणूक दिल्याचे प्रकरण ताजे असतनाच आता सिंधुदुर्ग वनविभागातील अनेक अधिकारी, कर्मचारी यांना कोल्हापूर येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडून परस्पर नेमणुका दिल्याचे पुढे आहे. यात मागील वर्षभरात ज्याची मॅटकडे तसेच न्यायालयीन प्रकरणे सुरू आहेत, अशांनाही पदोन्नती देण्यात आली आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग उपवनसंरक्षक मात्र अंधारात मर्जीतील अधिकाऱ्यांकडे महत्त्वाचे तीन तीन कार्यभार

सावंतवाडी : कणकवली वनक्षेत्रपाल यांंना परस्पर नेमणूक दिल्याचे प्रकरण ताजे असतनाच आता सिंधुदुर्गवनविभागातील अनेक अधिकारी, कर्मचारी यांना कोल्हापूर येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडून परस्पर नेमणुका दिल्याचे पुढे आहे. यात मागील वर्षभरात ज्याची मॅटकडे तसेच न्यायालयीन प्रकरणे सुरू आहेत, अशांनाही पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच मर्जीतील अधिकाऱ्यांकडे तीन तीन कार्यभार देण्यात आल्याची चर्चा वनविभागातच सुरू आहे. याबाबत सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांना विचारले असता आपणास काही माहीत नाही, असे सांगत या विषयावर बोलण्याचे टाळले.कणकवली वनक्षेत्रपाल दीपक सोेनवणे यांंच्याकडचा प्रभारी कार्यभार काढून घेत तो रत्नागिरीतील अधिकाऱ्यांकडे दिल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता हे प्रकरण एकच नसून, अशी अनेक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. गेल्या वर्षभरात अशी अनेक प्रकरणे आहेत, की जी सिंधुदुर्ग वनविभागाला विश्वासात न घेताच बदल्या आणि पदोन्नती देण्यात आल्या असून, या नेमणुका परस्पर कोल्हापूर येथून करण्यात आल्याने स्थानिक पातळीवर यांची जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक यांना विचारले असता ते मात्र यावर बोलण्याचे टाळत असून, मी अशा कोणत्याही शिफारशी बदली आणि बढतीसाठी केल्या नाहीत एवढेच ते सांगत आहेत. सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनीही जर कोण परस्पर सिंधुदुर्गबाबत कोण निर्णय घेत असेल तर योग्य नाही या कोल्हापूर येथील या अधिकाऱ्याला बदली आणि बढती यामध्येच एवढा रस का, असा सवालही बरेगार यांनी केला आहे. मी याप्रकरणी चौकशी व्हावी यासाठी प्रयत्न करणार असून, मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे माहिती देणार असल्याचे सांंगितले आहे.सर्व प्रकरणांची चौकशी होण्याची अपेक्षामर्जी पाळणाऱ्या अधिकाऱ्यांकडे तीन तीन विभागांचे कार्यभार देण्यात आले आहेत. तर सिंधुदुर्गमध्ये सक्षम अधिकारी असताना बाहेरचे अधिकारी आणण्यात आले आहेत. तर ज्याच्यावर मॅट तसेच अन्य प्रकरणात न्यायालयीन प्रकिया सुरू आहे. अशा अधिकारी व कर्मचारी यांनाही त्यांना हवे ते ठिकाण देण्यात आले आहे. मात्र, हे सर्व करत असताना कोल्हापूर येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने सर्व नियम धाब्यावर बसवून या नेमणुका दिल्याचे वनविभागातील अधिकारी, कर्मचारी सांगत असून, या सर्व प्रकरणाची आणि बदल्यांची चौकशी व्हावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागsindhudurgसिंधुदुर्ग