शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
5
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
6
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
7
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
8
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
9
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
10
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
11
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
12
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
13
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
14
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
15
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
16
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
17
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
18
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
19
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
20
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

सिंधुदुर्ग : बागेश्री रमाकांत यांच्या गायनाने संगीत मैफिल सजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 17:04 IST

कणकवली येथील गंधर्व फाऊंडेशनच्या वतीने आशिये दत्त क्षेत्र येथे 23 वी गंधर्व मासिक शास्त्रोक्त सभा आयोजित करण्यात आली होती. मुंबई येथील गझलनवाझ भीमराव पांचाळे यांच्या कन्या व युवा पिढीच्या सुप्रसिद्ध गायिका बागेश्री रमाकांत यानी शास्त्रोक्त संगीताच्या विविध रुपाने ही मैफिल सजवली. यानिमित्ताने रसिकाना एक चांगला स्वरानुभव त्यांनी उपलब्ध करून दिला.

ठळक मुद्देबागेश्री रमाकांत यांच्या गायनाने संगीत मैफिल सजलीआशिये येथे गंधर्व फाऊंडेशनचे आयोजन

कणकवली : येथील गंधर्व फाऊंडेशनच्या वतीने आशिये दत्त क्षेत्र येथे 23 वी गंधर्व मासिक शास्त्रोक्त सभा आयोजित करण्यात आली होती. मुंबई येथील गझलनवाझ भीमराव पांचाळे यांच्या कन्या व युवा पिढीच्या सुप्रसिद्ध गायिका बागेश्री रमाकांत यानी शास्त्रोक्त संगीताच्या विविध रुपाने ही मैफिल सजवली. यानिमित्ताने रसिकाना एक चांगला स्वरानुभव त्यांनी उपलब्ध करून दिला.बागेश्री रमाकांत यांनी त्यांचे वडिल गझलनवाझ भीमराव पांचाळे तसेच किराणा घराण्याच्या अर्चना कान्हेरे,ग्वाल्हेर घराण्याच्या अपूर्वा गोखले यांच्याकडून तालीम हस्तगत केली. आपल्या वैशिष्ट्य पूर्ण गायकीने त्यांनी रसिकाना अनेकवेळा मंत्रमुग्ध केले आहे. त्याना विविध पुरस्कार देखील मिळाले आहेत.त्यामुळे बागेश्री रमाकांत यांची मैफिल रसिकांसाठी एक महापर्वणीच ठरली . त्यांनी मैफिलिची सुरुवात राग 'मधुवंती' मधील बंदिशीने केली व तराणा सादर केला. त्यानंतर उपशास्त्रीय प्रकारात ठुमरी व धाडीला राम तिने का वनी? या नाटकातील 'घाई नको बाई अशी आले रे बकुळ फुला'हे पद सादर केले. रसिकांनी त्याला मनापासून दाद दिली.त्यांच्या 'तू फुलांचा घोस माझा',स्वप्नात काल माझ्या येऊन कोण गेले, 'उघड्या पुन्हा जाहल्या (शोभा गुर्टु) या व शेवटी 'आस वाना त्रास नको'या गझलांच्या सादरीकरनानंतर त्यानी मैफिल एका उंचीवर नेऊन ठेवली . संजय कात्रे यानी घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीत त्यानी सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरे देत आपला सांगितिक प्रवास कथन केला. गंधर्व सभेच्या शास्त्रोक्त संगीत सभा आयोजनाचेही त्यांनी यावेळी कौतुक केले.त्याना तबलासाथ सुप्रसिद्ध तबला वादक प्रसाद करंबेळकर व हार्मोनियम साथ अभिनय रवंदे यानी केली.ही गंधर्व संगीत सभा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक श्रीराम गवंडळकर यांच्या स्मृति प्रित्यर्थ प्रायोजित केली होती.शाम सावंत यानी प्रास्ताविक केले.सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ बाळ फोंडके यांच्या हस्ते उपस्थित कलाकारांचे स्वागत करण्यात आले. युवा शास्त्रोक्त संगीत आयकॉन रमाकांत गायकवाड(बागेश्री यांचे पती) यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली. त्यांचा दामोदर खानोलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सुप्रसिद्ध गझलकार मधुसुदन नानिवडेकर तसेच जिल्ह्यातील नामवंत कलाकार व संगीत रसिक या सभेला उपस्थित होते.ही गंधर्व सभा यशस्वीतेसाठी मनोज मेस्त्री,अभय खडपकर, शाम सावंत, दामोदर खानोलकर,सागर महाडिक, संतोष सुतार,किशोर सोगम,विलास खानोलकर, राजू करंबेळकर व बाबू गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले.16 डिसेंबर रोजी 24 वी गंधर्व सभा !पुढील 24 वी गंधर्व संगीत सभा 16 डिसेंबर रोजी मुंबईतील सुप्रसिध्द हार्मोनियमवादक आदित्य ओक आपल्या हार्मोनियम एकलवादनाने सजवणार आहेत. गंधर्व संगीत सभेची हि द्वितीय वर्षपूर्ती असल्याने या सभेसाठी रसिकानी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे. 

टॅग्स :musicसंगीतsindhudurgसिंधुदुर्ग