शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: पत्नीबरोबरच्या प्रेमसंबंधास विरोध करणाऱ्या पतीचा खून; आरोपीस जन्मठेप

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 22, 2023 18:59 IST

आरोपीच्या नातेवाईकांनी मयताची पत्नी व मुलांना फितूर करण्याचा प्रयत्न

सिंधुदुर्ग : कामगार विश्वजित कालिपद मंडळ (३४ रा. पश्चिम बंगाल) याचा लोखंडी टिकावाने जबर मारहाण करुन खून करणाऱ्या आरोपी सुखदेव सोपान बारिक (३० रा. उल्हासनगर) यास भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये जन्मठेप, भा. दं. वि. कलम २०९ अन्वये ३ वर्ष सश्रम कारावास, कलम ३४१ अन्वये १ महिना कारावास व एकूण १२५००- रु. दंड अशी शिक्षा  अतिरिक्त सत्र न्यायाधीश सानिका जोशी यांनी सुनावली.बांदा गडगेवाडी, (ता. सावंतवाडी) येथील मकरंद तोरस्कर यांच्या घरी भाड्याने विश्वजीत कालीपद मंडळ, (मूळ रा. सरईपूर गोलबाघन, जि. परगणा राज्य पश्चिम बंगाल ) हा कामगार आपली पत्नी व दोन मुलांसह राहत होता. सिद्धदोष अपराधी- सुखदेव सोपान बारीक,( रा. उल्हासनगर, मूळ रा. बाजबेलेनी, राज्य पश्चिम बंगाल) याने दि. ५ जून २०२१ रोजी मध्यरात्री विश्वजीत कालीपद मंडळ याच्या घरात प्रवेश करुन, त्याची पत्नी व दोन मुलांना बेडरुममध्ये कोंडून ठेवले आणि मृतास लोखंडी टिकावाने जबर मारहाण करुन त्याचा खून केला आणि पुरावे नष्ट करुन रेल्वेने पळून गेला. याप्रकरणी बांदा पोलिस ठाण्याचे गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिस तपासात सुखदेव सोपान बारीक हाच आरोपी असल्याचे निष्पन्न केले. त्यास उल्हासनगर येथून अटक करण्यात आले. गुन्हयाचे तपासात आरोपीचे मृताच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. त्या प्रेमसंबंधाबद्दल मृत हा विरोध करत होता, म्हणून आरोपीने जिवे ठार मारल्याचे निष्पन्न झाले.सरकारतर्फे १२ महत्त्वाचे साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीच्या नातेवाईकांनी मयताची पत्नी व मुलांना फितूर करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, सरकारी पक्षाच्यावतीने घेण्यात आलेल्या उलट तपासात महत्वाच्या कबुल्या मिळून अखेर सत्य बाहेर आले. अति. सत्र न्यायाधीश सानिका जोशी यांनी याप्रकरणी आरोपीस शिक्षा सुनावली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCourtन्यायालय