शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडून पालिकांना अतिरिक्त मदतीची गरज : राजन तेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 18:02 IST

Rajan Teli Sawantwadi Sindhudurg- सावंतवाडी येथील नगरपालिकेच्या हद्दीत आरक्षित असलेल्या जागा घेण्यासाठी जवळपास ३०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे जी महत्त्वाची आरक्षणे आहेत, त्यासाठी पैशांची तरतूद करण्यासाठी सर्व नगराध्यक्षांसह नगरविकास प्रधान सचिवांची भेट घेऊन मागणी करणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.

ठळक मुद्देसरकारकडून पालिकांना अतिरिक्त मदतीची गरज : राजन तेली नगरपालिकांची आर्थिक स्थिती सध्या गंभीर, प्रधान सचिवांची भेट घेणार

सावंतवाडी : येथील नगरपालिकेच्या हद्दीत आरक्षित असलेल्या जागा घेण्यासाठी जवळपास ३०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे जी महत्त्वाची आरक्षणे आहेत, त्यासाठी पैशांची तरतूद करण्यासाठी सर्व नगराध्यक्षांसह नगरविकास प्रधान सचिवांची भेट घेऊन मागणी करणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.सरकार नगरपालिकेला सातवा वित्त आयोग लागू करत असताना नगरपालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेत नाही. पगार आणि पेन्शन द्यायलाही पालिकेकडे पैसे नाहीत. त्यामुळे सरकारने पालिकांना अतिरिक्त मदत करण्याची गरज असल्याचीही तेली यांनी मागणी केली आहे.

ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, अमित परब आदी उपस्थित होते.तेली म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये देवगड व वैभववाडी तालुक्यात भाजपाच्या २ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या. तब्बल ६१ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले.साळगावकर हे नैराश्यातून जात आहेतमाजी नगराध्यक्ष बबन साळगावकर हे नैराश्यातून जात आहेत. त्यामुळे त्यांना सावरायला वेळ दिला पाहिजे. आठ वर्षे नगराध्यक्षपद भूषविलेल्या साळगावकर यांना ३०८ मतांवर समाधान मानावे लागते, त्यांच्यावर काय बोलावे? अशी टीका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी येथे केली.

साळगावकरांच्या राजीनाम्यामुळेच संजू परब यांना सावंतवाडी शहराच्या नगराध्यक्षपदाचा बहुमान मिळाला. त्यामुळे साळगावकर यांना शुभेच्छा, असेही तेली यांनी सांगितले.

टॅग्स :Rajan Teliराजन तेली sindhudurgसिंधुदुर्गMuncipal Corporationनगर पालिकाSawantwadiसावंतवाडी