शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्ग चिखलमय, वाहनचालकांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 14:30 IST

कणकवली शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा चिखलमय झाला. या चिखलापासून आपली कोणी सुटका करील का? असा प्रश्न कणकवलीतील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, पावसामुळे महामार्ग चिखलमय झाल्याने या मार्गावरून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्देमुंबई-गोवा महामार्ग चिखलमय महामार्गावरून वाहने चालविताना वाहनचालकांची कसरत

कणकवली : कणकवली शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा चिखलमय झाला. या चिखलापासून आपली कोणी सुटका करील का? असा प्रश्न कणकवलीतील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, पावसामुळे महामार्ग चिखलमय झाल्याने या मार्गावरून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे.रविवारी सकाळी पावसाने काहीशी उघडीप दिली होती. कडक ऊनही पडले होते. अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी कोसळत होत्या. मात्र, सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत हा पाऊस पडत होता. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.सध्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी मातीचा भराव करण्यात आला आहे. त्यातच महामार्गाच्या शेजारी गटारे बांधण्यात न आल्याने पावसाचे चिखलमिश्रीत पाणी रस्त्यावर येत आहे. पाऊस थांबल्यावर रस्त्यावर पसरलेला चिखल काहीसा सुकत आहे. मात्र, या चिखलामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे कठीण होऊन बसले आहे. तर वाहनचालकांना रस्त्यावरून वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे.चिखलामुळे अनेक पादचारी पाय घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या त्रासापासून आपल्याला कोण सोडविल?असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणारा ठेकेदार या समस्येकडे लक्ष देत नाही. तर प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे त्रस्त नागरिकांना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीरमहामार्गाचे काम करीत असताना गटारे तयार करण्यात न आल्याने ठिकठिकाणी पाणी साचत आहे. काही विहिरींमध्ये हे पाणी जात असल्याने विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. तर ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी महामार्गावर पसरल्याने त्यातून चालत जात असल्याने पादचाऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी लक्ष देतील का? अशी विचारणा नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग