शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मल्टिस्पेशालिटी रुग्णालय वेत्येत, सहा एकर जागेवर उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 16:48 IST

मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सावंतवाडीत जागा उपलब्ध न झाल्यास कुडाळ नेरूर येथे हलविण्याचे संकेत खासदार विनायक राऊत यांनी दिले होते. मात्र, शुक्रवारी सावंतवाडी वेत्ये येथे सहा एकर जागा वेत्ये ग्रामपंचायतची असल्याचे समोर येताच त्या जागेची स्वत: पालकमंत्री उदय सामंत यांनी खासदार राऊत यांच्यासह पाहणी केली आणि त्या जागेवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आता मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सावंतवाडी तालुक्यातच राहणार हे निश्चित झाले आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देमल्टिस्पेशालिटी रुग्णालय वेत्येत, सहा एकर जागेवर उभारणारपालकमंत्री, खासदार यांच्याकडून जागेची पाहणी, प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

सावंतवाडी : मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सावंतवाडीत जागा उपलब्ध न झाल्यास कुडाळ नेरूर येथे हलविण्याचे संकेत खासदार विनायक राऊत यांनी दिले होते. मात्र, शुक्रवारी सावंतवाडी वेत्ये येथे सहा एकर जागा वेत्ये ग्रामपंचायतची असल्याचे समोर येताच त्या जागेची स्वत: पालकमंत्री उदय सामंत यांनी खासदार राऊत यांच्यासह पाहणी केली आणि त्या जागेवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आता मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सावंतवाडी तालुक्यातच राहणार हे निश्चित झाले आहे.यावेळी वेत्ये सरपंच स्नेहा मिठबावकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना सहसंर्पक प्रमुख शैलेश परब, गितेश राऊत, रूची राऊत, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, सुनील गावडे, गुणाजी गावडे, नरेश मिठबावकर, माजी सभापती रमेश गावकर, राजन पवार आदी उपस्थित होते.

सावंतवाडी येथे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे ठरले होते. त्याचे भुमिपूजनही झाले होते. मात्र राजघराण्याशी असलेल्या वादामुळे हे रुग्णालय तसेच राहिले. पुन्हा या रुग्णालयाच्या जागेबाबत शोधाशोध झाली आणि सावंतवाडीमध्ये जागा मिळाली नाही. त्यामुळे हे रुग्णालय कुडाळ नेरूर येथे हलविण्याचे संकेत खासदार राऊत यांनी दिले होते. मात्र, वेत्ये येथे ग्रामपंचायतच्या मालकीची सहा एकरची जागा उपलब्ध असल्याचे लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांसह पालकमंत्री व खासदार यांनी स्वत: जागेची पाहणी केली.

यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर व तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना जागेचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही जागा मध्यभागी असून सावंतवाडीपासूनही काही अंतरावर आहे. तसेच मुंबई-गोवा या महामार्गालगत ही जागा असल्याने अनेक दृष्टीने फायदा होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी रुग्णालय होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.हीच जागा निश्चितीसाठी प्रयत्न : राऊतखासदार विनायक राऊत यांनी वेत्ये येथील जागेवर पालकमंत्री सामंत यांनी शिक्कामोर्तब केले असून हीच जागा निश्चित करण्याच्यादृष्टीने आपला प्रयत्न असणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी वेत्ये ग्रामपंचायतचेही आभार मानले. त्यांनी ही जागा आपल्या ताब्यात ठेवली. यावेळी खासदार राऊत यांनी माझ्या बोलण्याने वेग आल्याचे सांगत टीका करणाऱ्यांवर अप्रत्यक्षरित्या टीका केल. राऊत म्हणाले, हे शासन अतिशय पटापट निर्णय घेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यांच्याकडे एखादे काम घेऊन गेले की ते लगेचच होकार देतात आणि कामाला सुरूवात होते. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलVinayak Rautविनायक राऊत Uday Samantउदय सामंतsindhudurgसिंधुदुर्ग