शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत महावितरणने अचानक सुरू केले भारनियमन, ग्रामस्थ झाले आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 14:22 IST

सबस्टेशनमधील कर्मचार्‍यांसोबत ग्रामस्थांची खडाजंगी झाली. जोपर्यंत संबंधित अधिकारी येत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.

कणकवली : कणकवली तालुक्यातील वागदे, हळवल, कसवण, शिरवल या गावांमध्ये काल, गुरूवार सायंकाळपासून अचानक महावितरणनेवीज पुरवठा खंडीत करत भारनियमन सुरू केले. त्यामुळे तेथील ग्रामस्थ संतप्त झाले. कणकवलीतील वीज वितरणाच्या सबस्टेशनवर धडक देत संबंधित कर्मचार्‍यांना ग्रामस्थांनी जाब विचारला. उशिरापर्यंत अधिकारी तेथे न आल्याने ग्रामस्थ संतापले होते.नळयोजनेचे वीज बिल थकीत असल्याने त्याच फिडरवरील गावांमध्ये लोडशेडींग सुरू करण्यात आले आहे. कणकवलीत वीजपुरवठा सुरळीत असताना आमच्या गावांवर अन्याय का? असा सवाल वागदेचे माजी सरपंच संदीप सावंत यांच्यासह ग्रामस्थांनी विचारला. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांनी सबस्टेशनला धडक दिली. सबस्टेशनमधील कर्मचार्‍यांसोबत ग्रामस्थांची खडाजंगी झाली. जोपर्यंत संबंधित अधिकारी येत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.त्यानंतर सबस्टेशनमधील कर्मचार्‍यांनी संबंधित अधिकार्‍यांना याबाबतची माहिती दिली. सायंकाळी ७ ते रात्री १२ आणि पहाटे ५ ते दुपारी २ अशा वेळेत भारनियमन केले जाणार असल्याची माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यानंतर त्या गावातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र पहाटे पुन्हा वीज पुरवठा खंडीत केला जाणार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.यावेळी हळवल सरपंच दीपक गुरव, राजू राणे, संदीप सावंत, शिवा राणे, अरूण राणे, रोहित राणे, प्रभाकर चव्हाण, बंटी राणे, प्रथमेश राणे, राजन धुरी, अविनाश राणे, विराज तावडे, विठ्ठल सावंत, सुभाष राणे, राजन तांबे आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गelectricityवीजmahavitaranमहावितरण