शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

राऊत-सामंत वाद हा राणे यांनी लावलेला जावईशोध!, खासदार विनायक राऊतांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 16:22 IST

कणकवली : किरण सामंत विरुद्ध विनायक राऊत हा नसलेला वाद आमदार नितेश राणे यांनी लावलेला जावईशोध आहे. स्वतः करायचे आणि त्याचे ...

कणकवली : किरण सामंत विरुद्ध विनायक राऊत हा नसलेला वाद आमदार नितेश राणे यांनी लावलेला जावईशोध आहे. स्वतः करायचे आणि त्याचे खापर इतरांवर फोडायचे हा नितेश राणे यांचा पूर्वीपासूनचा धंदा आहे. संतोष परब हल्लाप्रकरणी पोलीस खऱ्या आरोपीला लवकरच समोर आणतील त्यावेळी नितेश राणे यांचे उखळ पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही. असा टोला खासदार विनायक राऊत यांनी लगावला.          कणकवली विजय भवन मध्ये शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, संजय आग्रे, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना समन्वयक राजू राठोड, संदेश सावंत- पटेल, राजू रावराणे,शांताराम रावराणे आदी उपस्थित होते. यावेळी खासदार राऊत म्हणाले, आमदार नितेश राणे यांनी माझ्याबरोबरच किरण सामंत व आमदार वैभव नाईक यांची चिंता करू नये. त्यांनी स्वतःची चिंता करावी.            किरण सामंत लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत का? असा प्रश्न राऊत यांना विचारला असता लोकसभा निवडणुकीला अजून पुष्कळ दिवस आहेत. किरण सामंत इच्छुक असतील किंवा नसतील मला माहीत नाही. मात्र, इच्छुक कोणीही राहू शकतो, त्यात गैर असे काहीच नाही असेही ते म्हणाले.        ते पुढे म्हणाले, स्वतःच्या कार्यकर्त्यांची डोकी फोडायची ही विकृती नारायण राणे यांच्या घराण्याने निर्माण केली आहे. ती शिवसेनेने केलेली नाही. शिवसैनिक स्वतःच्या कार्यकर्त्याचे रक्त कदापिही सांडत नाहीत. तर शिवसैनिक हा स्वतःच रक्त देऊन इतरांचे जीव वाचवतो. सत्यविजय भिसे, रमेश गोवेकर, अंकुश राणे या घटनांचा संदर्भ देत खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर यावेळी  टीका केली. तसेच जिल्हा बँकेमध्ये सतीश सावंत बाजी मारणार हे समजताच त्यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर हल्ला करण्यात आला. मात्र, आमचा पोलिसांवर विश्वास असून ते या प्रकरणातील खऱ्या आरोपींपर्यंत निश्चित पोहचतील. असेही राऊत म्हणाले.  हा तर कोकणचा अपमान ! म्याव , म्याव करणे हा कोकणचा अपमान आहे. ही कोकणची परंपरा नाही. मात्र, नितेश राणे यांनी तसे केले आहे. लोकांनी त्याचे वागणे पाहिले आहे. ते वागणे योग्य नाही. केंद्राने जीएसटीचे ५६ हजार कोटी दिले पाहिजेत    पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट आम्ही खासदारांनी दिल्ली येथे घेतली.  चांगल्या कामांसाठी आम्ही पंतप्रधानाना भेटतच असतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. आम्ही बालिशपणा करत नाही. पंतप्रधानांनी आवर्जून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची चौकशी केली. पेट्रोल व डिझेल कर कपात करायची असेल तर राज्य शासनाला ५६ हजार कोटी जीएसटीचे केंद्र शासनाने दिले पाहिजेत.  त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न करावेत. केंद्राकडून ६० हजार कोटी पेक्षा जास्त येणे राज्य सरकारला  आहे. ते दिल्यास  बरे  होईल,असेही ते म्हणाले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVinayak Rautविनायक राऊत Nitesh Raneनीतेश राणे