शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

'रत्नागिरीतील महामार्गाचा रखडलेला प्रश्न तेवढा सोडवा'

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 8, 2024 12:57 IST

दहा वर्षांतील उद्योगविरोधी भूमिकेतही बदल व्हायला हवा

सिंधुदुर्ग : अनेक वर्षे संथगतीने सुरू असलेला मुंबई गोवा महामार्ग आणि सतत नाकारले जाणारे उद्योग या दोन प्रश्नांकडे नवे खासदार नारायण राणे यांनी विशेष लक्ष द्यावे, अशी अपेक्षा केली जात आहे. जरी महामागर्गाचा प्रश्न सिंधुदुर्गात नसला तरी तो रत्नागिरीत आहे. गेल्या दहा वर्षात मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नाकडे जितक्या गांभीर्याने पाहिले जाणे अवाश्यक होते, तितक्या गांभीर्याने पाहिले गेले नाही. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पाठपुरावा केल्यामुळे काही प्रश्न तरी मार्गी लागले. मात्र दिल्लीकडून जेवढा जोर लावणे अपेक्षित होते, तेवढे झाले नाही. आता नव्या खासदारांनी तरी रत्नागिरी जिल्ह्याचे हे दुखणे दूर करावे, अशी अपेक्षा रत्नागिरीकर करत आहेत.

नवीन खासदारांकडून पाच अपेक्षामहामार्ग अर्धवटच : मुंबई-गोवा महामार्गाचे रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीतील काम गेली आठ दहा वर्षे रखडले आहे. अनेक पूलही अपूर्ण आहेत.रिफायनरीचा गुंता कायम : प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाचा गुंता कायम आहे. बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रकल्प गरजेचा आहे.योजना होते, जलस्रोत तेच : जिल्ह्यात पाण्याच्या असंख्य योजना राबवूनही टंचाई खूप आहे. त्यासाठी जलस्रोत बळकट करणे आवश्यक आहे.आंबा, काजूचे प्रश्न बाकी : अर्थकारणासाठी आंब्यावरील रोग आणि परदेशी काजू बी या दोन समस्यांवरही उपाय शोधायला हवे आहेत.कोल्हापूर रेल्वेमार्ग : व्यापारी दृष्टीने गरजेचा असलेला रत्नागिरी -कोल्हापूर रेल्वेमार्गही फक्त चर्चेत आहे. कोणताही तोडगा निघालेला नाही.

अपेक्षांबाबत नागरिक म्हणतात..आधी झालेल्या विरोधामुळे रिफायनरी प्रकल्पाचा विषय अर्धवटच राहिला आहे. मूळ प्रस्तावित जागी हा प्रकल्प झाला तर राजापूर तालुका किंवा जिल्हा नाही, तर राज्याच्या अर्थकारणात मोठे बदल होतील.  - अविनाश महाजन, बागायतदार, राजापूरमुंबई - गोवा महामार्गाची सध्याची स्थिती अशी आहे की यापेक्षा आधीचा रस्ता चांगला होता, असे म्हणण्याची वेळ आली आहे. नव्या खासदारांनी केंद्रातून दबाव आणून हे काम लवकरात लवकर पूर्ण करुन घ्यायला हवे. - देवदत्त मुकादम, व्यावसायिक

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRatnagiriरत्नागिरीPoliticsराजकारणNarayan Raneनारायण राणे