शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

आंबोलीत सर्वाधिक पाऊस, चेरापुंजीलाही टाकले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 16:08 IST

संपूर्ण जून महिनाभर दडी मारलेल्या आंबोलीतील पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून हजेरी लावली. परंतु हा पाऊस जो सुरू झाला तो सप्टेंबरची ९ तारीख उजाडली तरी कमी होण्याचे नाव घेत नाही. आंबोलीमध्ये पर्जन्यमापन करणारे भाऊ ओगले यांनी आंबोलीत आतापर्यंत गेल्या २५ वर्षांतील हा सर्वाधिक पाऊस झाल्याचे सांगितले आहे.

ठळक मुद्देआंबोलीत सर्वाधिक पाऊस, चेरापुंजीलाही टाकले मागेजुलैपासून पावसाला सुरुवात; ८५७५ मिलीमीटर पावसाची नोंद

आंबोली : संपूर्ण जून महिनाभर दडी मारलेल्या आंबोलीतील पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून हजेरी लावली. परंतु हा पाऊस जो सुरू झाला तो सप्टेंबरची ९ तारीख उजाडली तरी कमी होण्याचे नाव घेत नाही. आंबोलीमध्ये पर्जन्यमापन करणारे भाऊ ओगले यांनी आंबोलीत आतापर्यंत गेल्या २५ वर्षांतील हा सर्वाधिक पाऊस झाल्याचे सांगितले आहे.आतापर्यंत तब्बल ३४० इंच म्हणजेच ८५७५ मिलीमीटर पाऊस झाल्याचे त्यांनी सांगितले.आंबोलीतील जाणकारांच्या म्हणण्यानुसार तीस वर्षांपूर्वी असा पाऊस पडत असे, तो पुन्हा यावर्षी बघायला मिळाला. त्याकाळी मे महिन्याच्या १५ तारीखला पाऊस सुरू होत असे, तो आॅक्टोबरच्या मध्यापर्यंत पडत असे. ४०० किंवा ४५० इंच पाऊस आंबोलीत पडत असे.मधल्या काळात जागतिक तापमान वाढ, वृक्षतोड अशा विविध कारणांमुळे आंबोलीतील पाऊस कमी झाला होता. २९० इंच ते ३०० इंच इतका पाऊस आंबोलीत होत असे. गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पाहता २०१५ साली २९२ इंच, २०१६ साली १९० इंच, २०१७ मध्ये २८३, २०१८ साली २९६ इंच आणि २०१९ साली म्हणजेच यावर्षी हा पाऊस तब्बल त्रिशतक गाठून ३४० इंचापर्यंत पोहोचला आहे.भारतात सर्वात जास्त पाऊस चेरापुंजी येथे पडतो. मात्र, यावर्षी तो ६१०० मिलीमीटर इतकाच झाला आहे. मात्र, आंबोलीत ८५७५ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी आंबोलीच्या पावसाने यापूर्वीची सर्व रेकॉर्ड ब्रेक केली आहेत, असेच जाणकारांकडून बोलले जात आहे.आणखी तब्बल एक महिना पावसाचा शिल्लक असून या एक महिन्यात सात इंचापेक्षा जर जास्त पाऊस झाला तर आंबोलीच्या इतिहासातील सर्वात जास्त पाऊस यावर्षी झाला, असे म्हटले जाईल.पर्यटन व्यावसायिकांना बसतोय फटकाआंबोलीत कोसळलेल्या यावर्षीच्या पावसामुळे आंबोलीतील जनजीवन विस्कळीत झाले. शेतीचे नुकसान झाले. घाटामध्ये ठिकठिकाणी रस्ते खचले, दरडी कोसळल्या. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायिकांनासुद्धा त्याचा फटका बसला. संपूर्ण महाराष्ट्रालाच यंदाच्या वर्षी पावसाने झोडपून काढले.

आंबोलीमध्ये कोसळणाऱ्या पावसाचे पाणी कोल्हापूर जिल्हा, बेळगावातील काही भाग तसेच बांदा आदी भागांमध्ये जात असते. आंबोलीत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे या भागांमध्येसुद्धा पाणी येण्यास आंबोलीचा पाऊस कारणीभूत ठरला होता.

टॅग्स :Amboli hill stationआंबोलि हिल स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग