शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कोकणसाठी जादा गाड्यांची सोय, गणेशोत्सव काळात पश्चिम रेल्वेचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 17:06 IST

गणेशोत्सवासाठी मुंबई सेंट्रल आणि बांद्रा ते मंगळूर, थिविमपर्यंत जादा गाड्या ६ ते २३ सप्टेंबर या कालावधीसाठी सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे.

ठळक मुद्दे गणेशोत्सव काळात कोकणसाठी जादा रेल्वे गाड्यांची सोय ६ ते २३ सप्टेंबरच्या कालावधीत पश्चिम रेल्वेचे नियोजन

सिंधुदुर्ग : गणेशोत्सवासाठी मुंबई सेंट्रल आणि बांद्रा ते मंगळूर, थिविमपर्यंत जादा रेल्वेगाड्या ६ ते २३ सप्टेंबर या कालावधीसाठी सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे.मुंबई सेंट्रल-मंगळूर जंक्शन ते मुंबई सेंट्रल ही विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०९००१ मुंबई सेंट्रल येथून १२ व १९ सप्टेंबरला रात्री २३.५० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी १९.३० वाजता मंगळूरला पोहोचेल. तेथून गाडी क्र. ०९००२ मंगळूरहून गुरुवार १३ आणि २० सप्टेंबरला रात्री २३.१० वाजता सुटून मुंबई सेंट्रलला सकाळी ७ वाजता पोहोचेल.

बांद्रा ते मंगळूरू विशेष गाडी क्रमांक ०९००९ बांद्रा येथून ११ आणि १८ सप्टेंबरला रात्री २३.५५ वाजता सुटेल. मंगळूरु जंक्शन येथून १२ आणि १९ सप्टेंबरला रात्री २३.१० वाजता सुटेल.तसेच बांद्रा ते मंगळूरु वातानुकुलीत विशेष गाडी क्रमांक ०९०११ ही बांद्रातून ९, १६ आणि २३ सप्टेंबरला रात्री २३.५५ वाजता सुटेल. परतीसाठी मंगळूरहून १०, १७ आणि २४ सप्टेंबरला रात्री २३.१० वाजता सुटेल. अहमदाबाद ते थिविम ही विशेष गाडी ०९४९ अहमदाबाद येथून सायंकाळी १६.१५ वाजता शुक्रवारी ७, १४ आणि २१ सप्टेंबरला सुटेल. परतीसाठी ०९४१७ थिवीम येथून शनिवारी ८, १५ आणि २२ सप्टेंबरला सायंकाळी १६.३० वाजता सुटेल.अहमदाबाद-मडगाव शहर विशेष गाडी क्र. ०९४१६ अहमदाबाद येथून मंगळवार ११ आणि १८ सप्टेंबरला रात्री ९.३० वाजता सुटेल. परतीसाठी गाडी क्रमांक ०९४१५ मडगांव जंक्शन येथून बुधवारी १२ आणि १, ९ सप्टेंबरला सायंकाळी १८.०० वाजता सुटेल.मुंबई सेंट्रल ते थिविम विशेष गाडी असून गाडी क्रमांक ०९००७ मुंबई सेंट्रल येथून सायंकाळी ६ वाजता सुटणार आहे. ही गाडी ८, १०, १३, १५, १७, २० व २२ सप्टेंबरला निघेल. गाडी क्रमांक ०९००८ थिविम येथून ७, ९, ११, १४, १६, १८, २१ व २३ सप्टेंबरला थिवीमहून निघणार आहे.नव्या गाड्यांमध्ये आरक्षणाची आशादरम्यान, यापूर्वी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने आता नव्याने जाहीर करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांचे तरी आरक्षण आपल्याला मिळेल, अशी आशा अनेक भाविकांना लागून राहिलीआहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेsindhudurgसिंधुदुर्ग