शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

मनसे पक्षाचा लढा मराठी माणसासाठीच!, मालवणमध्ये बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 12:59 IST

mns, sindhdurug, parsaramuparkar जिल्ह्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्यास सत्ताधारी लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. आमदार वैभव नाईक यांनी केलेले भ्रष्टाचार मनसे लवकरच जनतेसमोर मांडणार आहे, असा इशारा मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिला.

ठळक मुद्देमनसे पक्षाचा लढा मराठी माणसासाठीच!, मालवणमध्ये बैठकआमदारांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार : परशुराम उपरकर

मालवण : जिल्ह्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्यास सत्ताधारी लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. आमदार वैभव नाईक यांनी केलेले भ्रष्टाचार मनसे लवकरच जनतेसमोर मांडणार आहे, असा इशारा मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिला.मालवण तालुका मनसेची बैठक उपरकर यांच्या अध्यक्षतेखाली भरड येथील लीलांजली सभागृहात झाली

यावेळी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, उपजिल्हाध्यक्ष शैलेश अंधारी, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुका सचिव विल्सन गिरकर, शहर अध्यक्षा भारती वाघ, उपतालुकाध्यक्षा राधिका गावडे, मनविसे तालुकाध्यक्ष विनायक गावडे, उपतालुकाध्यक्ष उदय गावडे, भूषण गावडे, सचिन गावडे विशाल ओटवणेकर, हरी खवणेकर, संकेत वाईरकर, विशाल माडये, अमित राजापूरकर, नंदकिशोर गावडे, संतोष सावंत, प्रणव उपरकर आदी उपस्थित होते.उपरकर म्हणाले, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे जनता कणखर नेतृत्व म्हणून सध्या पाहत आहे. विविध प्रश्न घेऊन अनेक शिष्टमंडळे कृष्णकुंजवर दाखल होत असून राज ठाकरे त्यांचे प्रश्न सोडवित आहेत. मराठी माणसाच्या हक्कासाठी मनसे लढत आहे. या सर्व कारणांमुळे अनेक तरुण कार्यकर्ते मनसेमध्ये दाखल होत आहेत. तालुक्यात सर्जेकोट, तारकर्ली, देवबाग, साळेल, मालवण शहरातील अनेक तरुणांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. नवरात्रोत्सवानिमित्त गावागावात मनसेचा झेंडे फडकविले जाणार आहेत.तालुक्यातील प्रश्न जैसे थे!आमदार वैभव नाईक तालुक्यातील आरोग्यविषयक सुविधांचा प्रश्न सोडवू शकलेले नाहीत. महिला रुग्णालय सहा वर्षांत अपुरेच राहिले. त्यासाठी एक कोटीचा निधी आणल्याचे आमदार सांगतात व काही दिवसांनी पुन्हा त्याच रुग्णालयासाठी मंत्र्यांकडे निवेदने देऊन निधीची मागणी करतात. आमदार असे जनतेला किती दिवस खेळवित राहणार? 

टॅग्स :MNSमनसेParshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्ग