शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयातील स्वछतागृहाला तीन वर्ष लागतात मग.., आमदार वैभव नाईकांनी बांधकाम विभागाला घेतलं फैलावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 13:40 IST

आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यालयाकडून सुरु असलेल्या कामाचा घेतला आढावा

कणकवली: तुम्ही स्वतःच्या कार्यालयाचे बाथरूम तीन वर्ष पूर्ण करू शकत नसाल तर तालुक्यातली पुल, साकव, रस्त्यांची कामे काय करणार? तुमच्यासारखा दिरंगाई करणारा अधिकारी आतापर्यंत कधी बघितला नाही, अशा शब्दात आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांना फैलावर घेतले.वागदे, डंगळवाडी साकवाला मंजुरी मिळाली व कार्यारंभ आदेश मिळाला. पण अद्याप काम सुरु का होत नाही ? सोमवारपर्यंत हे काम सुरू न झाल्यास तुमच्या कार्यालयासमोरच येऊन भूमिपूजन करू, असा इशाराही यावेळी वैभव नाईक यांनी दिला.सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यालयाकडून सुरू न झालेल्या व अपूर्ण असलेल्या बजेटमधील व एफडीआर मधील कामांचा आढावा आमदार नाईक यांनी शुक्रवारी कार्यालयाला भेट देवून घेतला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, रुपेश आमडोस्कर, सचिन आचरेकर, ललित घाडीगावकर, रवी गावडे, नितीन ताटे व इतर उपस्थित होते.हळवल रेल्वे उड्डाण पुलासाठी कन्सल्टन्सी नेमन्याकरिता ४० लाख रुपये उपलब्ध करून दिले. त्यानुसार कन्सल्टन्सीचा अहवाल आला. मात्र वर्ष होत आले तरी आपल्याकडून कोणतीच कार्यवाही होत नाही. येथील शासकीय विश्रामगृहासाठी साडेतीन ते चार कोटी रुपये उपलब्ध करून देऊनही अद्याप काम सुरू होत नाही. पणदूर घोडगे पूल, बोर्डवे रस्ता, कुंदे रस्ता, आचरा कालावल रस्ता, अणाव- पणदूर पुल अशी अनेक कामे सुरू झालेली नाहीत किंवा अपूर्णावस्थेत आहेत. या कामांबाबत आपण कोणताही आढावा घेतलेला नाही.कुडाळ तालुक्यात नव्वद कोटीची कामे सुरू झालीत. आपल्याकडे २६ कोटी एमडीआर मधून मिळाले पण अजून पंधरा कोटीचीही कामे सुरू झालेली नाहीत. बजेटमधील व एमडीआर मधील किती कामे अपूर्ण व सुरू झालेली नाहीत, याची यादी दाखवा. आम्ही सोमवारी पुन्हा येऊ असे आमदार नाईक म्हणाले. ठेकेदारांची बिल्ड कॅपॅसिटी बघूनच त्यांना कामे द्या. कामे अर्धवट ठेवलेल्या ठेकेदारांना परत परत कशी काय कामे देता? कामे पूर्ण होण्यावर भर द्या, असेही आमदार  नाईक यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक