शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

१८ दिवसांच्या अज्ञातवासानंतर अखेर आमदार नीतेश राणे जिल्हा बँकेत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 19:12 IST

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेण्या हल्ला झाला होता. या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून ते गायब झाले होते.

ओरोस : जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर २७ डिसेंबर पासून भूमिगत असलेल्या भाजप आमदार नितेश राणे बाहेर पडले आहेत. प्रथमच त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात हजेरी लावली. तब्बल अठरा दिवसांनी ते समोर आले.उच्च न्यायालयाने त्यांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी गुरूवारी पूर्ण झाली. आता १७ जानेवारीला न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे तोपर्यंत त्यांना अटक करू नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे ते गुरूवारी जिल्ह्यात दाखल झाले.जिल्हा बँक निवडणुकीची रणधुमाळी रंगात आलेली असताना १८ डिसेंबर रोजी कणकवली येथे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेण्या हल्ला झाला होता. या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा कणकवली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.त्यामुळे या प्रकरणी अटक होऊ नये, यासाठी राणे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत हे २७ पासून भूमिगत झाले होते. जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर २८ व २९ रोजी सुनावणी झाली. ३० रोजी यावर निर्णय देत जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.तब्बल १८ दिवसांनी माध्यमांसमोरत्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. त्यावर अजून उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज ११ वाजता यावर उच्च न्यायालयात सुनावणी होती. त्यामुळे जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी आ राणे उपस्थित झाले नव्हते. परंतु आजच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने १७ जानेवारीपर्यंत निकाल पुढे ढकलला आहे. त्यामुळे नितेश राणे, संदेश सावंत जिल्हा बँकेत दाखल झाले होते.

२७ डिसेंबर पासून तब्बल १८ दिवसांनी ते बाहेर आले आहेत. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह जिल्हा बँक संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे