शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

..अन्यथा पंतप्रधान मोदी मंत्रीपद काढून घेतील, आमदार केसरकरांचा राणेंना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 18:34 IST

सावंतवाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना समोरच्याची टिंगल करता येते. पण त्यांना आदर्श काम करता येत नाही. सिंधुदुर्ग ...

सावंतवाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना समोरच्याची टिंगल करता येते. पण त्यांना आदर्श काम करता येत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी गेल्या पंचवीस वर्षांत त्यांना जेवढा निधी आणता आला नाही तेवढा मी पाच वर्षात आणला. त्यामुळेच त्याच्या नाकावर टिच्चून जनता मला सतत निवडून देत आहे. नारायण राणे यांना केंद्रीय मंत्री पद दिले याचा कोकणला अभिमान आहे. मात्र त्यांनी चांगल काम करून दाखवावे अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंत्र्याच्या कामाबाबत फार गंभीर असतात. त्यामुळे दिलेले मंत्रीपद ही काढून घेतील असा टोला माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लगावला. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.केसरकर म्हणाले, माझी तुलना सरपंचा सोबत करता पण मी मंत्री असतानाही तसाच होतो. आणि आमदार असताना ही तसाच आहे. राणेंना मंत्री असताना लोक विचारतात आणि ते मंत्री नसले की ते सैरभैर कसे वागतात हे माहित आहे. त्यामुळे राणेंनी टिका करण्यापेक्षा कोकणचा विकास कसा करता होईल हे बघावे असेही केसरकर म्हणाले.राणेनी गेल्या पंचवीस वर्षांत जेवढा निधी आणला तेवढा मी मागील पाच वर्षांत आणला. त्यामुळे त्यांनी टिका करताना विचार करावा. तसेच विधान सभेत चांगले काम केले नसते तर पाच वर्षे अर्थसंकल्प मांडला नसता. विरोधकांनी मला प्रश्न विचारले त्याची उत्तरे देता आली नसती असे सांगत राणेंनी केलेले आरोप खोडून काढले.'ते' उघड करायला लावू नये

माझ्या विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत राणेंनी मला पाडण्यासाठी राजन तेली करवी निरोप पाठवला होता. पण तेव्हा त्यांच्या सरपंचानी हा निरोप धुडकावून लावला. हे उघड करायला राणेंनी लावू नये असा इशारा ही केसरकर यांनी दिला.यावेळी या पत्रकार परिषदेस तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, अशोक दळवी, सुदन्वा आरेकर, योगेश नाईक उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे Dipak Kesarkarदीपक केसरकर