शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अक्कल सांगण्यासाठी आलेल्यांना “अकलेचे तारे” दाखवून दिले, मंत्री नारायण राणेंचा अजित पवारांना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 16:26 IST

आपला व बँकेचा कोणताही संबंध नाही. आपण जे कर्ज काढले आहेत त्याच्या व्याजापोटी वर्षाला सात ते आठ कोटी रुपये बँकेत भरतो.

सिंधुदुर्ग : अक्कल सांगण्यासाठी आलेल्यांना अकलेचे तारे दाखवून दिले, असा टोला जिल्हा बँक अध्यक्ष निवडणुकीनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे महाविकास आघाडीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता लगावला. दरम्यान गद्दारीचा वारसा असलेल्या लोकांच्या ताब्यात असताना बँकेची बदनामी झाली. मात्र आता नव्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या ताब्यात बँक सुरक्षित राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपला व बँकेचा कोणताही संबंध नाही. आपण जे कर्ज काढले आहेत त्याच्या व्याजापोटी वर्षाला सात ते आठ कोटी रुपये बँकेत भरतो. आतापर्यंत फक्त दोन ते तीन वेळा मी बँकेत आलो आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्हा बँक अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी बँकेचे मावळते अध्यक्ष सतीश सावंत यांचे नाव न घेता टीका केली. त्यांचा वारसा गद्दारीचा आहे, अशा लोकांना आपण पळवून लावले आहे. त्यामुळे याचा लपूनछपून फिरण्याची परिस्थिती त्यांच्यावर आली आहे. तो एक अपशकून होता, असे सांगत त्यांनी येणाऱ्या काळात जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी गोरगरीब लोकांना कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिला जाईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे Ajit Pawarअजित पवार