शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

तिलारी धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्याचे आदेश, मंत्री केसरकरांचा विद्युत निर्मिती प्रकल्पाला शॉक

By अनंत खं.जाधव | Updated: March 29, 2023 18:29 IST

सर्व वीज बाहेरच्या जिल्ह्यांना पुरविण्यात येते. त्यामुळे याचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना

अनंत जाधव सावंतवाडी: दोडामार्ग तालुक्यातील विजघर येथील महालक्ष्मी विद्युत निर्मिती प्रकल्पाला तिलारी धरणातून सोडण्यात येणारे पाणी तत्काळ बंद करण्याचे आदेश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पाटबंधारे विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही विद्युत निर्मिती कंपनी गेल्या बारा वर्षांपासून वीजनिर्मितीचे काम करत असून पहिल्यांदाच या कंपनीला मंत्री केसरकर यांनी शॉक दिला आहे.तिलारी या आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या पाण्यावर विजघर येथे महालक्ष्मी विद्युत निर्मिती प्रकल्प 2010 मध्ये आघाडी सरकारच्या काळात उभारण्यात आला आहे. या विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी तिलारी धरणातून किती पाणी घ्यायचे यांची कोणती ही नोंद पाटबंधारे विभागाकडे नाही. कंपनीशी झालेल्या करारात ही नमूद करण्यात आले नाही. विशेष म्हणजे तिलारी धरणाचे गेट हे या विद्युत निर्मिती प्रकल्पाच्या तोंडावर असल्याने प्रकल्पाला धरणातून किती पाणी जाते याचा अंदाज येत नाही. तसेच या विज निर्मिती प्रकल्पातून तयार करण्यात आलेल्या विजेचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोणताही फायदा नाही. ही सर्व वीज बाहेरच्या जिल्ह्यांना पुरविण्यात येते. त्यामुळे याचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना बसतो.तिलारी पाटबंधारे प्रकल्प हा 16 टीएमसीचा आहे. मात्र सध्या या धरण क्षेत्रात 54 टक्केच पाणी साठा शिल्लक आहे. पावसाळ्यात हे धरण क्षेत्र पूर्ण पणे भरलेले असते. उन्हाळ्यात धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने याच्या झळा या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना बसतात. परिणामी धरण लाभ क्षेत्रातील शेतीला तसेच बागायतीला पाणी मिळत नाही.अनेक वेळा यावर आंदोलने झाली, मात्र कोणीही दखल घेतली नाही. सोमवारी (दि.27) मंत्री केसरकर यांनी आयोजित केलेल्या बैठकीतही दोडामार्ग मधील काही शेतकऱ्यांनी पाणी मिळत नसल्याचा मुद्दा लावून धरला. त्यानंतर मंत्री केसरकर यांनी याच बैठकीत अधीक्षक अभियंता विजय थोरात यांना विजघर विद्युत निर्मिती प्रकल्पाचे पाणी तत्काळ बंद करा पाच कोटीची वीज आणि पन्नास कोटीचे पाणी कसे शक्य फायदा कोणाला या सगळ्याची चौकशी लावण्याचे सांगत पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी त्याचा रोख कंपनीवर कमी आणि राजकीय विरोधकांवर जास्त होता. त्यातच ही कंपनी विरोधी पक्षनेते अजित पवार याच्या जवळच्या व्यक्तीची असल्याने केसरकर यांना आयती संधी आल्याचे बोलले जात आहे.आमचे शेतकऱ्यांचे सरकार : केसरकर या विद्युत प्रकल्पाला उन्हाळ्यात पाणी देणे शक्य नाही. पावसाळ्यात हवे तेवढे पाणी द्या महाराष्ट्रात स्थापन झालेले सरकार हे शेतकऱ्यांचे आहे असे मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTilari damतिलारि धरणelectricityवीजDeepak Kesarkarदीपक केसरकर