शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री दीपक केसरकरांचा खरा चेहरा उघडा करणार, बबन साळगावकरांचा इशारा 

By अनंत खं.जाधव | Updated: May 30, 2024 18:03 IST

भुमिगत विद्युत वाहिन्याचा निधी केसरकरांमुळेच परत गेला

सावंतवाडी : भुमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदकडे आलेला निधी माझ्यामुळे मागे गेला अशी चुकीची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. त्याच्या या आरोपांना विधानसभा निवडणुकीत गावागावात जाऊन उत्तर देणार असून त्याचा खरा चेहरा जनतेसमोर उघडा करणार असल्याचा इशारा सावंतवाडी नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.साळगावकर म्हणाले, भुमिगत विद्युत वाहिन्या आलेला निधी परत गेला त्याला मी नाही तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हेच जबाबदार आहेत. कारण, खोदाई केलेले रस्ते बुजवण्यासाठी आपण जिल्हा नियोजनमधून निधी देतो असे आश्वासन देऊनही केसरकर यांनी तो निधी दिला नाही. म्हणूनच हे काम होऊ शकले नाही असा प्रत्यारोप साळगावकर यांनी केला. आजपर्यंत केसरकर यांनी जनतेला फसवण्याचाच प्रकार केला आहे. त्यामुळे त्यांचा खरा चेहरा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उघड करणार आहे.सावंतवाडी शहरातील मंजूर झालेल्या भुमिगत वीज वाहिन्याना निधी देण्यात खरा वाटा हा तत्कालीन वीज मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा होता. केसरकर यांचा यात काडी मात्र ही संबंध नव्हता कारण हा निधी जाहीर झाला त्या ओरस येथील बैठकीला केसरकर नव्हते मी होतो. माझ्या बैठकीतील भाषणावर हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे असे ही साळगावकर म्हणाले.गेल्या दहा वर्षात विद्युत समस्येवर साधी एक बैठक न घेणारे केसरकर निवडणुकीत मात्र जनतेला भूलभुलैया दाखवतात. आतापर्यंत एक प्रकल्प आणला नाही मात्र प्रकल्पाचे श्रेय घेऊन मते घेऊन जातात. मल्टीस्पेवालिटीचे भूमिपूजन केले पण ते रूग्णालय अद्याप उभे केले नाही. फक्त आश्वासना पलीकडे काहीच करू न शकणारे केसरकर यांना आता जनतेला उत्तर द्यावेच लागेल अशा शब्दांत साळगावकर यांनी त्याच्यावर प्रतिहल्ला चढवला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर