शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

गेल्या २५ वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला, चौकुळ ग्रामस्थांनी मिरवणूक काढत मंत्री केसरकरांचा नागरी सत्कार केला

By अनंत खं.जाधव | Updated: October 7, 2024 16:45 IST

सावंतवाडी : गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चौकुळ गावातील कबुलायतदार गावकर जमीन प्रश्नावर शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री ...

सावंतवाडी : गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चौकुळ गावातील कबुलायतदार गावकर जमीन प्रश्नावर शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सर्वमान्य तोडगा काढत शासन निर्णय निर्गमित केले. त्याबद्दल चौकुळ गावाच्यावतीने वाजतगाजत मंत्री केसरकर यांची मिरवणूक काढत नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी केसरकर यांनी चौकुळ गावात पर्यटन वाढीसाठी आपला प्रयत्न राहणार असून चौकुळशी असलेले नाते कधीही कमी होणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुका प्रमुख नारायण राणे , सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, सरपंच लीना गावडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.   केसरकर म्हणाले, कबुलायतदार गावकर जमिनीचा प्रश्न सोडवण्यास यश आलं याबद्दल मला समाधान वाटते. आता आपल्या जमिनीमध्ये विविध व्यवसाय सुरू करावेत. शासनाच्या योजना घ्याव्यात. ज्या ज्या वेळी माझी मदत लागेल त्यावेळी मी आपणास सहकार्य करेन. मी हा प्रश्न निवडणुकीसाठी सोडवलेला नाही. तर सर्वांच्या प्रेमापोटी हा प्रश्न सोडविला असल्याचे ते म्हणाले.कै. भरत गावडे, रामभाऊ गावडे यांच्यासारखी माणसं माझे सहकारी म्हणून होते. त्यांच्या गावासाठी काहीतरी केले पाहिजे अशी माझी भावना असून यापुढे माझे नेहमीच आपणास सहकार्य राहील असे स्पष्ट केले. आंबोली, चौकुळ व गेळे येथील गावाशी आमच्या कुटुंबाचे त्रृणानुबंध आहे. या परिसरात पर्यटन वाढीसाठी वाव आहे. त्यासाठी मी सदैव तत्पर आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर