शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मला गावबंदी करायची कोणाची हिम्मत, कावळेसाद ग्रामस्थांच्या इशाऱ्यावर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया

By अनंत खं.जाधव | Updated: July 29, 2024 17:15 IST

मला राजकीय दृष्ट्या बदनाम करण्याचा डाव

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या काही जमीन खरेदी करणारे आले आहेत. त्याचा कदाचित कावळेसाद पॉइंट वरच्या जमिनीवर डोळा असेल म्हणूनच ते माझ्याबद्दल गैरसमज पसरवित आहेत. पण मी मंदिरात येऊन सांगतो की माझा याप्रकरणाशी काडीशीही संबध नाही त्यामुळे मला यात ओढू नका. मी काल आज आणि उद्या ग्रामस्थासोबतच आहे. त्यामुळे मला गावबंदी करायची कोणाची हिम्मत असे जोरदार प्रत्युत्तर राज्याचे शालेय शिक्षण तथा भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी त्यांनी मला राजकीय दृष्ट्या बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला. गेळे येथील ग्रामस्थांनी रविवारी बैठक घेऊन कावळेसाद पॉइंटवरील जमिनी वरून केसरकर यांना गावबंदीचा इशारा दिला होता. त्याला केसरकर यांनी प्रत्युत्तर देत अप्रत्यक्ष तालूका मंडळ अध्यक्ष संदीप गावडे वर टीकास्त्र सोडले आहे.केसरकर म्हणाले, कावळेसात पॉईंटवरील जमिनीवरून ग्रामस्थांमध्ये जो काही गैरसमज आहे तो निश्चित दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण मुद्दामहून त्यांच्या कोणतरी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहे हे योग्य नाही. कावळेसाद पॉईंट वरील सर्व जमीन शासन पर्यटन प्रकल्पासाठी घेईलच असे नाही. जर त्यातील उर्वरित जमीन शिल्लक राहिली तर ती जमीन निश्चितच ग्रामस्थांना दिली जाईल.आंबोली, चौकुळ, गेळेचा जमिन प्रश्न ३० वर्ष प्रलंबित होता.या जमीनीवर आज पर्यत महाराष्ट्र शासनाची वहिवाट आहे. अशा जमीनीचे कधीही वाटप होत नाही पण जमीनी शेतकऱ्यांना. मिळाली पाहिजे यासाठी मी प्रयत्न केले कुठलाही प्रस्ताव अडवलेला नाही. तसं असेल तर देवळात येऊन नारळाला हात लावण्यास मी तयार आहे.असे आवाहन केसरकर यांनी दिले आहे.फक्त आंबोली व गेळे ग्रामस्थांचं एकच म्हणणं होतं की खाजगी जमीन वाटप करतना वन संबंधित जमीन ही वाटली जावी त्यामुळेच एवढे दिवस या जमीन वाटपाचा प्रश्न राहिला होता पण आता काहीजण नव्याने जमीन वाटप करतो म्हणून पुढे आले आहेत.त्यांना मला एकच सांगायचे आहे की आमचे या गावांशी वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध आहेत आज तुम्ही त्यांना माझ्याबद्दल गैरसमज पसरवून वेगळे करू शकता पण हे फार काळ टिकणार नाही.लोकांना समजून चुकेल की.. केव्हा ना केव्हातरी लोकांना समजून चुकेल की कोण खरे आणि कोण खोटे मी मंदिरात येऊन नारळावर हात ठेवून सांगेन की यामध्ये मी ग्रामस्थांसाठी काय काय केले ते आता काहिसा या कावळेसाद पॉइंटवरील जमिनीवर डोळा असेल म्हणूनच हे सर्व चालले आहे असा संशय ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर