शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडी बसस्थानकाचा नव्याने आराखडा होणार 

By अनंत खं.जाधव | Updated: August 14, 2023 16:52 IST

व्यवस्थापकीय संचालकांकडून आढावा : मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत पाहणी

सावंतवाडी : सावंतवाडी बस स्थानक हे मध्यवर्ती आहे. या बसस्थानकावर अत्याधुनिक सुसज्ज अशी एसटी आगाराची इमारत उभी करा व उर्वरित जागेतून उत्पादन मिळेल असे काही तरी निर्माण करा अशी सुचना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना केली. यावेळी चन्ने यांनी नव्याने आराखडा बनविण्यात येईल असे स्पष्ट केले.मंत्री दीपक केसरकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत सोमवारी सावंतवाडी एसटी आगाराची पाहणी केली. यावेळी एसटी महामंडळाचे मुख्य वास्तुविशारद निलेश रहिवाल, कार्यकारी अभियंता मीनल सोनवणे, सिंधुदुर्ग व्यवस्थापक अभिजित पाटील, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, आबा केसरकर, गजानन नाटेकर, अँड निता सावंत कविटकर, नंदू गावडे आदी उपस्थित होते.मंत्री केसरकर यांनी सावंतवाडी एसटी आगाराच्या संपूर्ण परिसराची पाहणी केली. बस स्थानकाची भरपूर जागा आहे. याठिकाणी असलेल्या जमिनीचा पुरेपूर उपयोग करून घेताना एसटी महामंडळाने स्वत:च्या उत्पादन वाढीसाठी वेगवेगळे प्रयोग करावेत. एसटी महामंडळाने स्वतः एखादा मॉल उभारणी करावा. त्यासाठी सर्व संबंधितांनी योग्य तो आराखडा जलदगतीने करावा अशा सुचना मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनीही एसटी बस स्थानकावर सर्व अधिकाऱ्यांची डेपोत बैठक घेऊन मंत्री केसरकर यांच्या निर्देशानुसार जलदगतीने प्रस्ताव व आराखडा तयार करण्यासाठी सुचना केल्या.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Sawantwadiसावंतवाडी