शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाने लाखोंचे नुकसान, विलवडेला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 13:50 IST

विलवडे या कृषीप्रधान गावाला वादळी पावसाने झोडपून काढल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. गावात विविध पिकांचे या वादळी पावसाने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारी यंत्रणेने पंचनामा करून नुकसान भरपाई लवकर मिळवून द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांतून होत आहे.

ठळक मुद्देवादळी पावसाने लाखोंचे नुकसान, विलवडेला पावसाने झोडपले शेतकऱ्यांवर कोरोनानंतर पावसाचे संकट; नुकसानीची मागणी

बांदा : विलवडे या कृषीप्रधान गावाला वादळी पावसाने झोडपून काढल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. गावात विविध पिकांचे या वादळी पावसाने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारी यंत्रणेने पंचनामा करून नुकसान भरपाई लवकर मिळवून द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांतून होत आहे.देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने विलवडे गावातील कलिंगड, पालेभाज्या, काकडी, दोडकी, वांगी, भेंडी या उत्पादनांना बाजारपेठ नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यांचा माल जागेवर कुजून गेला. त्यातच आता वादळी पावसाने दणका दिल्याने केळी बागायती, आंबा, काजू व इतर पिकांचे नुकसान झाले.सध्या उन्हाळ्याचा शेवटचा महिना असल्याने लोकांनी मिरच्या, भुईमूग, कडधान्ये, कोकम, इतर साहित्य उन्हात वाळत ठेवले होते. त्यांचे वादळी पावसात भिजून नुकसान झाले. त्याचप्रमाणे यावर्षी काजू पिकाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.गेले दोन दिवस सायंकाळच्या वेळी विजांचा गडागडाट होऊन सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. या पावसाने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले.विलवडे (टेंबवाडी) येथील केळी बागायतीतील १०० हून अधिक केळी घडांचे, पोफळी व इतर पिकांचे मिळून सुमारे ५० हजारांचे नुकसान झाल्याचे शेतकरी यशवंत नारायण सावंत व विठ्ठल नारायण सावंत यानी सांगितले.

मनोज दळवी, प्रमोद दळवी, श्रीराम सावंत, सूर्यकांत दळवी आदी १० हून अधिक शेतकऱ्यांच्या केळी बागायतींचे नुकसान झाले आहे. सरकारने पंचनामा करून नुकसान भरपाई लवकर मिळवून द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांतून होत आहे.

विलवडे गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावातील तरूण तुंटपुज्या पगाराच्या नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेतीकडे वळला आहे. शेती व शेतीपूरक व्यवसायातून गावाचा विकास साधण्यात यशस्वी झाले आहेत.

अपार कष्ट करण्याची जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर केळी, भाजीपाला व फळबागांबरोबरच कुक्कुटपालन, पशुपालन व्यवसाय करून एक प्रगतशील शेतकरी म्हणून नावारूपाला आले आहे. पण वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल का ? या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग