शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

म्हैस निघाली खड्ड्यातून बाहेर -मालवण येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 14:46 IST

शहरातील भरड भागातील कुमार कॉम्प्लेक्सनजीकच्या विहिरीत पडलेल्या म्हैशीला सामाजिक कार्यकर्ते महेश गिरकर व मालवण नगरपरिषदेचे स्वच्छता मुकादम रमेश कोकरे

ठळक मुद्देमहेश गिरकर, रमेश कोकरेंसह स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नांना यश 

 

मालवण : शहरातील भरड भागातील कुमार कॉम्प्लेक्सनजीकच्या विहिरीत पडलेल्या म्हैशीला सामाजिक कार्यकर्ते महेश गिरकर व मालवण नगरपरिषदेचे स्वच्छता मुकादम रमेश कोकरे यांच्यासह स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नातून बाहेर काढण्यात आले. विचित्र बांधणीच्या या विहिरीत पडलेल्या म्हैशीला अथक प्रयत्नांतून दोरीच्या सहाय्याने बाहेर काढून नागरिकांनी तिला जीवदान दिले.

मालवण भरड भागातील कुमार कॉम्प्लेक्सनजीकच्या अ‍ॅड. संजय शरद गांगनाईक यांच्या जागेत जुन्या काळातील व जुन्या बांधणीची विहीर आहे. या विहिरीचे तोंड जमिनीच्या पृष्ठभागाशी समांतर असल्याने काहीशा धोकादायक अशा या विहिरीवर प्लास्टिक कापड घालण्यात आले होते. 

सोमवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास विहिरीनजीकच्या मोकळ्या भागात गवत चरण्यासाठी आलेल्या म्हशींच्या कळपातील एक म्हैस विहिरीच्या दिशेने आली. प्लास्टिक कापडामुळे तिला विहिरीचा अंदाज न आल्याने कापडावर पाय ठेवताच ती थेट विहिरीत कोसळली. यावेळी तेथे असलेल्या अमित सावंत या मुलाला म्हैस विहिरीत कोसळल्याचे दिसल्याने त्याने याबाबतची माहिती वडील आपा सावंत यांना दिली. आपा सावंत यांनी याची माहिती नगरपरिषदेस दिली. यावेळी नगरसेवक यतीन खोत व नगरपरिषदेचे स्वच्छता मुकादम रमेश कोकरे घटनास्थळी दाखल झाले. विहिरीची खोली जास्त नसली तरी विहिरीच्या जुन्या विचित्र बांधणीमुळे विहिरीचा आयताकृती आकार निमुळता असल्याने म्हैशीला हालचाल करणेही कठीण बनले होते. त्यामुळे यातून म्हैशीला बाहेर कसे काढायचे हा प्रश्न जमलेल्या नागरिकांना पडला होता. यावेळी  सामाजिक कार्यकर्ते महेश उर्फ डुबा गिरकर यांना पाचारण करण्यात आले. यावेळी दीपेश पवार, गणेश चिंदरकर, पप्या नाईक, कुणाल खानोलकर, रामकृष्ण देसाई, रमाकांत अटक, शांती मांजरेकर, निषाद देसाई, महेंद्र करंगुटकर, गणेश पाडगावकर, अरविंद मोंडकर, देवानंद लुडबे, आपा सावंत, विलास मुणगेकर, विजय खरात, किशोर खानोलकर शिल्पा खोत, महानंदा खानोलकर, पल्लवी तारी, शालन सावंत आदी नागरिक उपस्थित होते.सर्वांनी सोडला सुटकेचा नि:श्वास घटनास्थळी दाखल झालेल्या महेश गिरकर व रमेश कोकरे यांनी प्रसंगावधान राखत विहिरीत उतरून म्हैशीला मजबूत दोरीच्या सहाय्याने बांधले. दोरी बांधल्यावर उपस्थित सर्व नागरिकांनी जोर लावून दोरी ओढून म्हैशीला विहिरीबाहेर काढण्यात यश मिळविले. म्हैस विहिरीबाहेर आल्यावर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. 

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकण