शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यवनसंरक्षकासह उपवनसंरक्षकाना मॅटचा दणका, वनविभागात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 22:22 IST

कणकवली वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी विनायक सावंत यांच्या निलंबनाबाबत योग्य तो निर्णय घ्या, असा आदेश ‘मॅट’ने देऊनही त्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याने मॅट प्राधिकारणाने कोल्हापूर वनपरिक्षेत्राचे मुख्यवनसंरक्षक अरविंद पाटील यांच्यासह सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड ठोठावला आहे.

सावंतवाडी : कणकवली वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी विनायक सावंत यांच्या निलंबनाबाबत योग्य तो निर्णय घ्या, असा आदेश ‘मॅट’ने देऊनही त्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याने मॅट प्राधिकारणाने कोल्हापूर वनपरिक्षेत्राचे मुख्यवनसंरक्षक अरविंद पाटील यांच्यासह सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. हा दंड स्वत:च्या खिशातून भरला जावा, असे आदेश ६ जानेवारीला बजावण्यात आले आहेत.कणकवली वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी विनायक सावंत यांच्यावरे वैभववाडी येथील मालकी क्षेत्रात अवैधरित्या वृक्षतोड केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई एक वर्षापूर्वी झाली होती. मात्र नंतर सावंत हे सेवानिवृत्त झाले होते. त्याच काळात त्यांनी वन न्याय प्राधिकरण म्हणजेच मॅटमध्ये धाव घेतली होती. मॅटने या सर्व प्रकरणावर माहिती घेतली तसेच तक्रारदार विनायक सावंत यांच्यासह वनविभागची बाजू ऐकून घेतली आणि आपला निर्णय जाहीर केला.हा निर्णय देत असताना २५ मार्च २०१७ ला विभागीय चौकशी पूर्ण झाली असून, त्यांच्या निलंबनाबाबत वनविभागाने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी सूचना वनविभागाला केली होती. पण अद्यापपर्यंत कोणताही निर्णय मॅट आदेशानंतरही घेण्यात आला नाही. याच काळात सावंत हे सेवानिवृत्त झाले होते. त्यांना सेवानिवृत्तीचे कोणतेही लाभ मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी पुन्हा मॅटकडे धाव घेतली होती. त्यावरून मॅटने वनविभागाला विचारणा केली होती.यावर मागील सुनावणीवेळी सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी मॅटकडे निलंबनाचा कालावधी हा निलंबन म्हणून धरण्यात यावा, असे चुकीचे उत्तर दिले. यावरून मॅटने याच विधानाला हरकत घेत ६ जानेवारी २०१८ ला कोल्हापूर वनपरिक्षेत्राचे मुख्यवनसंरक्षक अरविंद पाटील यांच्यासह सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण या दोघांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. हा दंड तत्काळ भरण्यात यावा तसेच सरकारी खर्चातून हा दंड न भरता स्वत:च्या खिशातून भरावा, असे आदेशही देण्यात आले आहेत.मॅटने दिलेल्या आदेशाने वनविभागात एकच खळबळ माजली असून, हा वनविभागात घडलेला पहिलाच प्रकार आहे. पुढील सुनावणी वेळी मॅटने मुख्यवनसंरक्षकासह सिंधुदुर्गच्या उपवनसंरक्षकाना हजर राहण्याचे आदेशही दिले आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग