शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
4
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
7
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
8
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
9
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
10
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
11
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
12
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
13
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
14
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
15
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
16
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
17
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
18
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
19
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
20
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"

हरिनामातून दिला जातोय ‘पाणी बचती’चा संदेश

By admin | Updated: March 23, 2016 00:21 IST

आज जागतिक जलदिन : वायफळ बतावणीला भजनीबुवांकडून लगाम, पाण्याबाबत प्रबोधनामुळे रसिकांमधून स्वागत--लोकमत विशेष

सिद्धेश आचरेकर -- मालवण --भजनी बुवांनी भजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणे आवश्यक आहे. हे तत्व कायमस्वरूपी अंगीकारल्यास काही भजन रसिकांची मानसिकता नक्कीच बदलेल. सध्या महाराष्ट्राला भीषण पाणी दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. दोन दिवसांवर आलेल्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षी कोरडी होळी खेळा, शक्यतो पाण्याचा अपव्यय टाळा असे आवाहन केले आहे. त्याच धर्तीवर भजनी बुवा आपल्या डबलबारीच्या सामन्यातून ‘पाणी बचती’वर गजर रचून भजन रसिकांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे सामाजिक भान जपत आहेत.भजनाची खरी ओळख ही नामस्मरणाबरोबर समाजप्रबोधनाची असते. शेकडो वषार्पूवीर्ची संत परंपरा जोपासत कोकणातील भजनी बुवांनी महाराष्ट्रसह इतर राज्यात वेगळा ठसा निर्माण केला आहे. मधल्या काळात बुवांकडून भजनाचा पाया ढासळला होता. मात्र वृत्तपत्रातील बातम्यांनी भजनातील अश्लीलता तसेच वायफळ बतावणीवर टीकेची झोड उठविल्याने अलीकडील काही महिन्यात भजनी बुवांनी समाजप्रबोधनाची कास धरली आहे. त्यामुळे भजन क्षेत्राला भविष्यात वेगळाच रंग चढेल यात शंका नाही!कुडाळ तालुक्यातील हिर्लोक आंबेडकरनगर येथील ज्येष्ठ भजनी बुवा तथा कुडाळ भजन संघटनेचे अध्यक्ष मोहन कदम यांच्यावतीने आयोजित डबलबारी सामन्यात बुवा समीर कदम आणि बुवा अनिल पांचाळ या दोन्ही युवा बुवांनी रसिकांना सामाजिक बांधिलकीचे भान देतानाच 'पाणी बचती'वर लाखमोलाचा संदेश दिला आहे. भारतात सर्वत्र होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यात पाण्याची बेसुमार उधळपट्टी होते. एकीकडे महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी बुवा समीर कदम रसिकांचे मनोरंजन करत समाजप्रबोधनही करत आहेत. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा तसेच काही अंशी कोकणपट्ट्याला दुष्काळाच्या झळा आतापासून बसण्यास सुरुवात झाली आहे. भजनाच्या माध्यमातून सामाजिक भान जपण्याचे संदेश दिले जात असून त्यामुळे सूज्ञ रसिकांतून भजनी बुवांचे स्वागत होत आहे.‘लोकमत’कडून भजनाबाबत समाज प्रबोधनयुवा बुवांनी सामाजिक चळवळीचे भान लक्षात घेता पाणी बचतीचा संदेश दिला याबद्दल आयोजक मोहन कदम यांनी आभार व्यक्त करत अशाच पद्धतीने नवख्या बुवांनी समाजप्रबोधानाच्या माध्यमातून भजन कला जिवंत ठेवावी. तसेच होळी सण साजरा करताना पाण्याचा कमीत कमी वापर व्हावा. दुष्काळाचा सामना करण्यासाठी कोरडी होळी खेळण्याचा संदेश दिला. तसेच ‘लोकमत’ने भजन क्षेत्रातील विविध बारकावे चित्रित करताना भजनातील अनावश्यक बाबींवर आवाज उठविला आहे.- मोहन कदम,ज्येष्ठ भजनी बुवा, कुडाळसिंधुदुुर्गला भजनाची मोठी परंपरासिंधुदुर्ग जिल्ह्यात भजनाची मोठी परंपरा आहे. प्रत्येक गावातील वाडीवाडीत भजनी मेळे आहेत. हे भजनी मेळे समाजप्रबोधनाचे कार्य गेली कित्येक वर्षे करीत आहेत. डबलबारी भजनाचे सामने प्रत्येक भागात होतात. त्यामुळे बुवांनी मनावर घेतल्यास ते प्रबोधन करू शकतात.भविष्यात होणारी पाणीटंचाई लक्षात घेता भजनातून पाणी वाचवण्याचा संदेश भजनीबुवांनी दिला तर ते विधायक कार्य ठरणार आहे.