शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

शल्यचिकित्सकांच्या अनुपस्थितीवरून सदस्य आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 17:41 IST

hospital, sindhudurgnews, kudal, hospital सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक अथवा त्यांचा प्रतिनिधी सभेला उपस्थित नसल्याने त्यांना आपल्या प्रश्नांचे उत्तर मिळाले नाही. यावर आम्ही रिकाम टेकडे आहोत का ? आम्हांला कामधंदा नाही म्हणून आम्ही येथे येतो का? अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली.

ठळक मुद्दे जिल्हा परिषद आरोग्य समिती सभा खासगी रुग्णालयावर धाड टाकण्याचा विषय ऐरणीवर

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील एका खासगी रुग्णालयावर मागील महिन्यात जिल्हा शल्य चिकित्सक यांनी धाड टाकल्याचे प्रकरण आरोग्य समिती सभेत सदस्य लॉरेन्स मान्येकर यांनी चर्चेत आणले. तसेच ही धाड योग्य होती का? असा प्रश्न उपस्थित केला. मात्र, जिल्हा शल्य चिकित्सक अथवा त्यांचा प्रतिनिधी सभेला उपस्थित नसल्याने त्यांना आपल्या प्रश्नांचे उत्तर मिळाले नाही. यावर आम्ही रिकाम टेकडे आहोत का ? आम्हांला कामधंदा नाही म्हणून आम्ही येथे येतो का? अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच पुढील सभेस जिल्हा शल्य चिकित्सकांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी सूचना सदस्य लॉरेन्स मान्येकर यांनी केली.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य समितीची मासिक सर्वसाधारण सभा सभापती सावी लोके यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, सदस्य राजेश कविटकर, लॉरेन्स मान्येकर, नूतन आईर, हरी खोबरेकर, तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.मागील महिन्यात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी कुडाळ तालुक्यातील एका खासगी रुग्णालयावर धाड टाकली होती. ही धाड कायदेशीर होती का ? की मागील रोष मनात ठेवून टाकण्यात आली होती? असा प्रश्न सदस्य लॉरेन्स मान्येकर यांनी आरोग्य समिती सभेत उपस्थित केला व याबाबत माहिती मागितली. मात्र, या सभेला जिल्हा शल्य चिकित्सक किंवा त्यांचा प्रतिनिधी उपस्थित नसल्याने मान्येकर यांना आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.

यावर त्यांनी आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांना चांगलेच फैलावर घेतले. जिल्हा शल्य चिकित्सकांना सभेचे निमंत्रण देण्यात आले नव्हते का? आणि सभेला कोण कोण अनुपस्थित आहेत हे पाहणार कोण? असा प्रश्न उपस्थित केला.तसेच आम्ही रिकाम टेकडे आहोत का ? आम्हांला कामधंदा नाही म्हणून आम्ही येथे येतो का? अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच पूर्वीची दुष्मनी काढून खासगी डॉक्टरांना जिल्हा शल्य चिकित्सक यांनी त्रास देऊ नये असा इशारा दिला.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून सतर्क रहावेलेप्टो आजाराचा आढावा घेतला असता जिल्ह्यात चालू महिन्यात लेप्टो साथीत वाढ झाल्याचे दिसून आले. महिनाभरात ८७ लेप्टोसदृश रुग्ण आढळून आले आहेत. यात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक ५६ रुग्ण, कणकवली १७, वैभववाडी २, देवगड २, मालवण ४, सावंतवाडी २ आणि दोडामार्ग ४ रुग्णांचा समावेश आहे.

दिल्लीमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मात्र, ही लाट जिल्ह्यात येऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे, अशी सूचना सदस्य हरी खोबरेकर यांनी केली.

टॅग्स :zpजिल्हा परिषदsindhudurgसिंधुदुर्गhospitalहॉस्पिटल