शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मालवणमध्ये राजकीय भूकंप!, नगराध्यक्ष महेश कांदळगावकरांची शिवसेनेला सोडचिठ्ठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 15:54 IST

...म्हणून पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय

मालवण : मालवण नगरपालिकेचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला. कांदळगावकर यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्नी स्मृती कांदळगावकर उपस्थित होत्या.ते म्हणाले, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मालवण पालिकेत प्रशासकीय अनुभवावर गेली पाच वर्षे नगराध्यक्ष या प्रतिष्ठेच्या खुर्चीवर नागरिकांनी आपल्याला बसवल्याबद्दल आपण जनतेचे आणि शिवसेनेने आपल्याला ही संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानत आहे.कुठलीही राजकीय स्पर्धा, शह- काटशह मनात न ठेवता आपल्याला दिलेल्या पाच वर्षांच्या कालावधीत शहराचा विकास कसा करता येईल, यासाठी मी प्रयत्न केले. हे करत असताना अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. पण, हा राजकारणाचा एक भाग म्हणून याला उत्तर प्रत्युत्तरात वेळ न घालवता तसेच प्रसिद्धीच्या मागे वेळ फुकट न घालवता जास्तीतजास्त शहराच्या विकास कामांकडे लक्ष दिले.विरोधकांच्या प्रभागातही लाखो रुपयांची कामे करण्यात आली आणि या सर्वांचा परिणाम म्हणून विरोधी नगरसेवकांनीही शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यामुळे पक्षाची ताकद वाढली. मालवणच्या पाणीयोजनेला बरीच वर्षे झाल्याने त्या ठिकाणी सुमारे ४५ कोटी. रुपयांची नवीन योजना प्रस्तावित करण्यात आली. लवकरच त्याला अंतिम मंजुरी मिळेल.

...म्हणून पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय

पाच वर्षे मालवणचा विकास हा एक अजेंडा घेऊन काम करत असताना माझा कुटुंबाकडे, आरोग्याकडे आणि व्यवसायाकडे दुर्लक्ष झाला. त्यामुळे यापुढे पक्षाच्या कामाला पुरेसा वेळ देणे शक्य होईल, असे वाटत नसल्यानेच या कारणास्तव आज पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे कांदळगावकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv Senaशिवसेना