शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सामुहिक अत्याचार प्रकरणातील संशयित निर्दोष; सहा वर्षापूर्वीची घटना

By अनंत खं.जाधव | Updated: March 30, 2024 23:37 IST

सावंतवाडी रेल्वेस्थानकावर घडला होता प्रकार : सहा वर्षापूर्वीची घटना

सावंतवाडी : गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार केल्याच्या घटनेतील रामचंद्र अंकुश घाडी (रा.आकेरी), राकेश कृष्णा राऊळ व प्रशांत कृष्णा राऊळ दोघेही (रा. मळगाव) या संशयित आरोपींची जिल्हा विशेष न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.ही घटना 21 फेब्रुवारी 2018 रोजी सावंतवाडी येथील रेल्वेस्थानक प्लॅटफॉर्मवर घडली होती.

सावंतवाडी मळगाव येथील अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार प्रकरण सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगलेच गाजले होते. यात सावंतवाडी रेल्वेस्थानक परिसरात अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिघा संशयित आरोपींन मुलीवर सामूहिक अत्याचार केला होता. याप्रकरणी संबंधित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.यात फिर्यादी अल्पवयीन मुलीस संशयितातील एकाने तिचा  प्रियकर आहे, हे तिच्या घरच्यांना सांगेन अशी धमकी देऊन तिला घरी सोडतो, असे सांगून जबरदस्तीने सावंतवाडी रेल्वेस्टेशन जवळील एका लॉजवर नेले होते. तेथे तिला गुंगीचे औषध घालून पाणी प्यायला दिले होते.त्यानंतर गुंगी आल्यावर तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले तसेच तिला लॉजवरुन बाहेर पडल्यानंतर रेल्वेस्टेशनजवळ उभ्या असणाऱ्या अन्य दोघांनी ५० रुपये घेऊन फिर्यादीस त्यांच्या ताब्यात दिले. 

फिर्यादीने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला असता दोघांनी तिला पाणी प्यायला दिले व तिला गुंगी आल्यावर जबरदस्तीने रेल्वेस्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर ३ वरील शेडवर नेले व त्या दोघांनी देखील शारीरिक संबंध ठेवले, अशी फिर्याद सावंतवाडी पोलीस ठाणे येथे देण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली होती.सध्या ते न्यायालयीन कोठडीत होते.  याकामी अॅड विवेक मांडकुलकर व अॅड संग्राम देसाई, अॅड भुवनेश प्रभू खानोलकर, अविनाश परब सुहास साटम आदींनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून विशेष न्यायाधीश एस. एस. जोशी यांनी तिघांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.

 तब्बल सहा वर्षानंतर संशयित येणार बाहेर सावंतवाडी येथील रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या प्लॅटफॉर्मवर अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार केल्या प्रकरणातील संशयित अटकेनंतर येथील कारागृहात होते. आता या प्रकरणी न्यायालयाकडून या तिघांची निर्दोष मुक्तता केल्यानंतर ते तब्बल सहा वर्षानंतर बाहेर येणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडी