शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठ पुन्हा गजबली ! कणकवली बस स्थानकात प्रवाशांची वर्दळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 15:12 IST

कणकवली शहरासह लगतच्या गावांमध्ये २० ते २७ सप्टेंबरपर्यंत स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. तो कालावधी संपल्यामुळे सोमवारपासून कणकवली व लगतच्या गावांमध्ये बाजारपेठा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची वर्दळ रस्त्यावर दिसत आहे. त्याचबरोबर बसस्थानकात प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे.

ठळक मुद्देबाजारपेठ पुन्हा गजबली ! कणकवली बस स्थानकात प्रवाशांची वर्दळ दुकाने चालू झाल्याने नागरिकांची गर्दी, जनता कर्फ्यू नंतर कणकवली पूर्वपदावर

सुधीर राणे

कणकवली : कणकवली शहरासह लगतच्या गावांमध्ये २० ते २७ सप्टेंबरपर्यंत स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. तो कालावधी संपल्यामुळे सोमवारपासून कणकवली व लगतच्या गावांमध्ये बाजारपेठा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची वर्दळ रस्त्यावर दिसत आहे. त्याचबरोबर बसस्थानकात प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे.जनता कर्फ्यूचा कालावधी संपल्याने सोमवार पासून कणकवली पुन्हा गजबजली. जनता कर्फ्युच्या कालावधीत निर्मनुष्य झालेल्या रस्त्यावर आता वर्दळ दिसू लागली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडले होते. त्यामुळे शहरातील काही विशिष्ट भागात गर्दी दिसून येत होती.

वारंवार होणाऱ्या लोकडाऊनला आता नागरिक ,व्यापारी कंटाळले असून प्रत्येक व्यक्तीने आपल्याबरोबरच इतरांची काळजी घेण्याच्या दृष्टीने शासनाने घालून दिलेले नियम पाळावे . अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई - गोवा महामार्गावरही गाड्यांचे प्रमाण सोमवारी वाढले होते. रिक्षा, चारचाकी , दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणात ये जा करीत होती.दरम्यान, कणकवली नगरपंचायत प्रशासनासमोर नियमांची अंमलबजावणी करण्याचे खरे आव्हान उभे आहे. विना मास्क असलेल्यांवर कारवाई, सोशल डिस्टनसिंग न पाळणाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी प्रयत्न व दुकानांमध्ये होणारी गर्दी रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांची पथके कार्यरत करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने नगरपंचायतीने प्रयत्न करावेत,असे आवाहन विविध स्तरातील नागरिकांकडून केले जात आहे.शासकीय कार्यालयात गर्दी !जनता कर्फ्यू संपल्यानंतर सोमवारी शासकीय कार्यालयेही विविध कामासाठी आलेल्या अभ्यागतांच्या गर्दी मुळे गजबजली होती. गेले आठ दिवस शासकीय कार्यालये पण शांत होती. मात्र, सोमवारी या कार्यालयांमध्ये गर्दी पहायला मिळाली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली