शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

Maratha reservation- मराठा आरक्षण स्थगितीवर याचिका दाखल करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 16:58 IST

राज्य सरकारने मराठा आरक्षणावरील स्थगितीच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करून स्थगिती उठविण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी सकल मराठा समाज, देवगड यांच्यावतीने तहसीलदार मारुती कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

ठळक मुद्देदेवगड सकल मराठा समाजाची मागणी राज्य शासनाकडून उपाययोजना व्हावी

देवगड : राज्य सरकारने मराठा आरक्षणावरील स्थगितीच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करून स्थगिती उठविण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी सकल मराठा समाज, देवगड यांच्यावतीने तहसीलदार मारुती कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी समन्वयक संदीप साटम, उमेश कणेरकर, किसन सूर्यवंशी, संकेत लब्दे, शामराव पाटील, नंदू देसाई, राजू भुजबळ, पंकज दुखंडे, युधी राणे, शैलेश लोके, प्रकाश सावंत, सुरेश घाडी, बाळा कदम, सत्यवान कदम, राजाराम राणे आदी उपस्थित होते.तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून मराठा समाजावर अन्याय झाला आहे. त्यामुळे आता मराठा समाजात तीव्र भावना उमटू लागल्या आहेत. आजपर्यंत मराठा समाजाने आरक्षण मिळविण्यासाठी त्याग केला असून अनेकांनी बलिदानही दिले आहे. याचा आपण विचार करून मराठा आरक्षणावरील स्थगितीच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करून स्थगिती उठविण्यासाठी तातडीने पावले उचलावीत.

चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकारने तातडीचे निर्णय घ्यावेत. या मागण्या मान्य न झाल्यास मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा सकल मराठा समाजाच्यावतीने निवेदनाद्वारे दिला आहे. सकल मराठा समाजाच्यावतीने निवेदनाद्वारे काही मागण्याही करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणsindhudurgसिंधुदुर्ग