शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

आंबा, काजू मंडळ नव्याने स्थापन होणार : पाटील

By admin | Updated: February 2, 2015 23:43 IST

हापूससाठी उष्णजल प्रक्रियेसाठी संशोधन सुरू

आंब्यावर ४८ अंश सेल्सियस उष्णजल प्रक्रिया एक तास केल्यास फळमाशीच्या अळ्या मरून जातात. बैंगनपल्ली, बदामी, तोतापुरी, केशरसारख्या जातीच्या आंब्याची साल जाड असल्याने या आंब्यासाठी संबंधित प्रक्रिया योग्य आहे. मात्र, हापूस आंब्याची साल पातळ असल्याने संबंधित प्रक्रियेमुळे हापूसच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वास्तविक आंब्यावर १५ एप्रिलनंतर फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. परंतु यासंबंधी तातडीने अहवाल पाठविण्यासाठी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य आंबा - काजू मंडळाची गतवर्षी स्थापना झाली. परंतु राज्यात सत्तांतर झाल्याने मंडळ बरखास्त झाले आहे. त्यामुळे मंडळाकडे अद्याप कोणताही निधी उपलब्ध नाही. परंतु मंडळाच्या स्थापनेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. येत्या हंगामापूर्वी आंबा काजू मंडळ कार्यरत होईल. युरोपीय देशांनी गतवर्षी आंबा निर्यातीवर बंदी आणली होती. मात्र, यावर्षी बंदी उठविली तरी गुणात्मक निर्बंध घालण्यात आले आहेत. फळमाशीमुळे आलेल्या निर्बंधावर पर्याय म्हणून आंब्यावर उष्णजल प्रक्रियेसंबंधी कोकण कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र आंबा - काजू मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आंबा निर्यातीसाठी पाठवताना तो कोणी पाठविला, कोठून आला, याबद्दल सर्व माहिती संकलित करण्यात येते. ‘वर्ल्ड ट्रेड’ करारानुसार नोंदणीकृत शेतकऱ्यांना सॅनेटरी, फायटोसॅनेटरी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अरब राष्ट्रांसाठी निर्यातीकरिता कीचकट प्रणाली नाही. मात्र, अमेरिकेसाठी किरणोत्सार, तर जपानसाठी व्हेपर ट्रीटमेंटचा अवलंब केला जातो. शेतकऱ्यांना अधिक दर मिळवण्यासाठी आंब्याचा दर्जा टिकविणे गरजेचे आहे. त्यामुळे यापुढे ‘अ‍ॅपेडा’ नोंदणीकृत पॅकहाऊसमधून पॅकिंग होऊन आंबा परदेशी पाठविला जाणार आहे. युरोपिय देशांनी फळमाशीचे कारण देत गतवर्षी आंबा नाकारला होता. यावर्षी निर्यातबंदी उठवली तरी फळमाशीविरहीत आंब्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी उष्णजलप्रक्रिया योग्य असल्याचा पर्याय सूचविण्यात आला आहे. मात्र, हापूसवर संबंधित प्रक्रिया केल्यानंतर त्याचा दर्जा व अन्य गुणधर्म टिकून राहतील का? याबाबत विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू करण्यात आले आहे.परदेशी निर्यातीसाठी आंबा रेडीएशन प्रक्रियेसाठी लासलगाव येथे पाठविण्यात येत होता. मात्र, वाशी मार्केटमध्ये ३० कोटीचे अद्ययावत रेडीएशन केंद्र उभारण्यात आले असून, यावर्षी लासलगाव येथे आंबा पाठवण्याऐवजी वाशी केंद्रावरच प्रकिया करण्यात येणार आहे. दिवसाला २ टन आंब्यावर रेडीएशन प्रक्रिया करणे वाशीतील केंद्रात शक्य होणार आहे. यामुळे वेळ व इंधन खर्चात बचत होणार आहे. शेतकऱ्यांना पॅक हाऊस उभारण्यासाठी शासनाकडून अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या रत्नागिरी, देवगड, वेंगुर्ला येथे पॅक हाऊस असून, नांदगाव व कुमामे येथे बांधकाम सुरू आहे. शिवाय काही शेतकरी खासगी पातळीवर पॅक हाऊस उभारत आहेत. अ‍ॅपेडाच्या मान्यतेने पॅक हाऊसमधून शेतकऱ्यांचा आंबा पाठवणे शक्य होणार आहे. वास्तविक आंब्याचा हंगाम दीड ते दोन महिन्याचा असतो. आंब्याला चांगला दर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी गट स्थापन करणे गरजेचे आहे. ग्रुप मार्केटिंग प्रणालीतूनही आंब्याला भाव मिळू शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे तितकेच गरजेचे आहे.यावर्षी शासनाने आंबा निर्यातीसाठी ‘मँगोनेट’ स्थापन केले आहे. जिल्ह्यातील १२३१ शेतकऱ्यांनी त्यासाठी नोंदणी केली आहे. येत्या २० रोजी नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. फळमाशी नियंत्रणाबरोबर कलम बागेसाठी वापरण्यात आलेली खते, कीटकनाशके याची नोंद कशी ठेवावी, यांची माहिती देण्यात येणार आहे. शिवाय आंबा काढणीपर्यंत बागांची तपासणीदेखील केली जाणार आहे. परदेशी निर्यातदारांकडे मँगोनेटमध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत. त्यामुळे निर्यातदार थेट शेतकऱ्यांकडे संपर्क साधणार आहेत. प्रत्येक देशाच्या अटी व शर्थी वेगळ्या असल्याने आंबा निर्यात त्यानुसार करावी लागत आहे.रत्नागिरी पणन विभागातून आंबा रेडीएशन प्रक्रियेसाठी लासलगावला पाठविण्यात येत होता. तद्नंतर तो आंबा मुंबई विमानतळाकडे पाठविण्यात येतो. आंबा वाहतुकीवर रस्त्याच्या दर्जामुळे विपरित परिणाम होतोच शिवाय तापमानाचाही परिणाम होतो. एकूच यामध्ये वेळ व इंधन खर्च वाढतो. त्याला पर्याय म्हणून समुद्रमार्गे निर्यात सुलभ होऊ शकते. त्यामुळे तसा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.कच्चा आंबा मुंबईतील वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविण्याची पारंपरिक पध्दत शेतकरी अवलंबतात. शेतकऱ्यांनी स्वत: निर्यातीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. याशिवाय राज्यांतर्गत किंवा देशांतर्गत अन्य मार्केटमध्ये आंबा विक्रीसाठी पाठविणे गरजेचे आहे. मंडळाच्या माध्यमातून मोठ्या शहरातून आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाऊ शकते. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांनी प्रतिसाद देणे तितकेच गरजेचे आहे. जेणेकरून निवडक आंबा परदेशी विक्रीला पाठवल्यानंतर उर्वरित चांगल्या आंब्याची विक्री शेतकऱ्यांना करता येऊ शकते. वर्गीकरणानंतर शिल्लक आंबा कॅनिंगकरिताही विकला जाऊ शकतो. आंब्यावरील कारखानदारी किंवा प्रक्रिया व्यवसाय वृध्दिंगत होणे गरजेचे आहे. जेणेकरून येथील शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात वाढ होईल. आंब्याचा दर्जा राखण्याबरोबर उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विद्यापीठ संशोधकांनी सुचवल्यानुसार आवश्यक त्यावेळी फांद्याची छटाई, तसेच खते, पाण्याचा योग्य वापर एकूणच लागवड व्यवस्थापन जपणे गरजेचे आहे. उत्पादकता वाढली तरच शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे...- मेहरुन नाकाडे