शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

मांडुकलीत पुराचे पाणी रस्त्यावर; कोल्हापूर मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 11:55 IST

गगनबावडा (कोल्हापूर) तालुक्यातील मांडुकली येथे पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे तळेरे-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गौरी-गणपती विसर्जन करून परतीच्या प्रवासाला निघालेल्या अनेक चाकरमान्यांची वाहने रस्त्यात अडकली आहे.

ठळक मुद्देगणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासात विघ्न वाहतूक फोंडाघाटमार्गे वळविली

वैभववाडी : गगनबावडा (कोल्हापूर) तालुक्यातील मांडुकली येथे पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे तळेरे-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गौरी-गणपती विसर्जन करून परतीच्या प्रवासाला निघालेल्या अनेक चाकरमान्यांची वाहने रस्त्यात अडकली असून त्यांना गगनबावड्यातून माघारी परतावे लागत आहे. दरम्यान, या मार्गावरील वाहतूक फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने विविध धरणांतून खबरदारी म्हणून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे तेथील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नद्यांच्या पाणी पातळीत झालेल्या वाढीचा फटका तळेरे-कोल्हापूर मार्गाला बसला आहे. या मार्गावरील मांडुकली येथे रविवारी सकाळी पुन्हा पुराचे पाणी रस्त्यावर आले आहे. दोन ते तीन फूट पाणी रस्त्यावर चढल्याने या मार्गावरील वाहतूक प्रशासनाने बंद केली आहे.पोलीस प्रशासनाने वैभववाडीत वाहतूक बंद करण्यापूर्वी शेकडो वाहने कोल्हापूरच्या दिशेने निघाली होती. ही सर्व वाहने मांडुकली येथे जाऊन अडकली आहेत. पाणी ओसरण्याची शक्यता कमी असल्यामुळे या सर्व वाहनांना गगनबावड्यातून माघारी परतून फोंडाघाटमार्गे जावे लागत आहे.दरम्यान, वैभववाडी पोलिसांकडून संभाजी चौकात वाहने थांबवून ती फोंडाघाटमार्गे मार्गस्थ केली जात आहेत. शुक्रवारी मांडुकली येथे पुराचे पाणी रस्त्यावर आले होते. त्यानंतर आता पुन्हा त्याच ठिकाणी पाणी रस्त्यावर आल्यामुळे गणेशोत्सवासाठी आलेल्या अनेक चाकरमान्यांच्या परतीचा प्रवास खडतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वैभववाडी-फोंडा मार्गावर वाहनांच्या रांगा दिसत होत्या.

परंतु, या मार्गावर मोठ्या प्रमाणात सध्या खड्डे पडले असल्याने हे खड्डे चुकविताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. तालुक्यात रविवारी सकाळपर्यंत १५७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

टॅग्स :floodपूरsindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूर