शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मालवण नगरपालिकेची नळपाणी पुरवठा योजना ५४ कोटींच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 19:20 IST

Muncipal Corporation Malvan Sindhudurg- मालवण शहराला पाणीपुरवठा करणारी २५ वर्षांपूर्वीची धामापूर नळपाणी योजना जीर्ण व नादुरुस्त बनल्याने नव्या नळपाणी योजनेस शासनाने मंजुरी दिली. २०१८ साली ३४ कोटी खर्चाची असलेली ही योजना सद्यस्थितीत ५४ कोटींवर पोहोचली आहे. ५४ कोटी २४ लाख रकमेच्या या नव्या अंदाजपत्रकास मान्यता देऊन प्रस्ताव शासन स्तरावर पाठवण्यासाठी मालवण नगरपालिकेची विशेष सभा घेण्यात आली. नळपाणी योजनेबाबत सभागृहात उपनगराध्यक्ष राजन वराडकर व गटनेते गणेश कुशे विरूद्ध बांधकाम सभापती मंदार केणी व नगरसेवक यतीन खोत यांच्यात खडाजंगी झाली.

ठळक मुद्देमालवण नगरपालिकेची नळपाणी पुरवठा योजना ५४ कोटींच्या घरात नगरसेवकांमध्ये खडाजंगी : अंदाजपत्रकास मतदानाने मान्यता

मालवण : शहराला पाणीपुरवठा करणारी २५ वर्षांपूर्वीची धामापूर नळपाणी योजना जीर्ण व नादुरुस्त बनल्याने नव्या नळपाणी योजनेस शासनाने मंजुरी दिली. २०१८ साली ३४ कोटी खर्चाची असलेली ही योजना सद्यस्थितीत ५४ कोटींवर पोहोचली आहे. ५४ कोटी २४ लाख रकमेच्या या नव्या अंदाजपत्रकास मान्यता देऊन प्रस्ताव शासन स्तरावर पाठवण्यासाठी मालवण नगरपालिकेची विशेष सभा घेण्यात आली. नळपाणी योजनेबाबत सभागृहात उपनगराध्यक्ष राजन वराडकर व गटनेते गणेश कुशे विरूद्ध बांधकाम सभापती मंदार केणी व नगरसेवक यतीन खोत यांच्यात खडाजंगी झाली.नवी नळपाणी योजना नागरिकांना गरजेची आहे. मात्र, २० कोटी वाढीव रकमेस कोणतीही खातरजमा न करता घिसाडघाई करून निर्णय घेणे योग्य नाही, असे सांगत गटनेते गणेश कुशे व उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी विरोध दर्शविला. योग्य पद्धतीने अथवा नव्याने अंदाजपत्रक सादरीकरण करण्याची मागणी केली.मात्र, बांधकाम सभापती मंदार केणी यांनी नव्या अंदाजपत्रकास तत्काळ मंजुरी गरजेची असल्याचे सांगत वाढीव अंदाजपत्रक योग्य असल्याचे सांगितले. नितीन वाळके व यतीन खोत यांनीही वाढीव अंदाजपत्रकास मंजुरी आवश्यक असल्याचे सांगितले. सुदेश आचरेकर यांनी ही योजना पूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जशी १०० टक्के अनुदानात मंजूर केली तशी या सत्ताधारी यांनीही मंजूर करण्याची भूमिका मांडली.नगराध्यक्ष यांनीही शहराच्या दृष्टीने लवकरात लवकर योजना मंजूर होणे गरजेचे आहे. त्यासाठी वाढीव अंदाजपत्रकास आपण मंजुरी द्यावी. पुढील निर्णय शासन घेईल. योजना योग्य पद्धतीने करून घेण्याची जबाबदारी आमची राहील, असे सांगितले. मात्र, कुशे व वराडकर यांची विरोधी भूमिका राहिल्याने वाढीव अंदाजपत्रक रकमेबाबत बांधकाम सभापती मंदार केणी यांनी ठराव मांडला. त्याला कुशे व वराडकर यांनी विरोध केला. आचरेकर व आप्पा लुडबे हे तटस्थ राहिले. उर्वरित सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग