शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

 'मालवण-कसाल'साठी २ कोटी ७० लाखाचा निधी मंजूर, आमदारांनी पाळला शब्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 17:54 IST

आमदार वैभव नाईक यांनी निवडणुकीआधी मालवण-कसाल राज्यमार्ग सुस्थितीत करेन असे दिलेले आश्वासन अवघ्या पाचव्या दिवशी पूर्णत्वास नेले आहे. राज्य शासनाच्या बांधकाम विभागाकडून विशेष निधी म्हणून या प्रमुख मागार्साठी २ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. त्यामुळे मालवणपासून कसालपर्यंतचा मार्ग 'खड्ड्यां'पासून मुक्त होणार आहे, असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.

ठळक मुद्दे 'मालवण-कसाल'साठी २ कोटी ७० लाखाचा निधी मंजूर, आमदारांनी पाळला शब्द

मालवण : आमदार वैभव नाईक यांनी निवडणुकीआधी मालवण-कसाल राज्यमार्ग सुस्थितीत करेन असे दिलेले आश्वासन अवघ्या पाचव्या दिवशी पूर्णत्वास नेले आहे. राज्य शासनाच्या बांधकाम विभागाकडून विशेष निधी म्हणून या प्रमुख मागार्साठी २ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. त्यामुळे मालवणपासून कसालपर्यंतचा मार्ग 'खड्ड्यां'पासून मुक्त होणार आहे, असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.मालवण दौ?्यावर आलेल्या आमदार नाईक यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहर अध्यक्ष बाबी जोगी, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, आरोग्य सभापती पंकज साधये, यशवंत गावकर आदी उपस्थित होते. मालवण-कसाल राज्यमागार्ची अनेक ठिकाणी अक्षरश: चाळण झाली होती. याबाबत सर्वसामान्य तसेच वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. यावेळी आमदार नाईक यांनी मालवणवासीयांना दिलेल्या शब्दनुसार रस्त्यावर हॉटमिक्स डांबरीकरण करण्यासाठी २ कोटी ७० लाखाचा निधी मंजूर केला आहे.मालवण नगरपरिषदेच्या शतक महोत्सवात आमदार वैभव नाईक यांनी मालवणवासीयांना संबोधित करताना मालवण-कसाल रस्तावरील खड्ड्यांची समस्या निवडणुकीआधी मार्गी लावेन, असे अभिवचन दिले होते. आमदार नाईक यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर आश्वासन दिल्याच्या पाचव्या दिवशी निधीला मंजुरी मिळाली आहे. येत्या आठवड्याभरात निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तात्काळ 'कार्पेट' डांबरीकरण केले जाणार आहे. याबाबत नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी रस्त्याच्या कामाची सुरुवात मालवणपासून केली जावी, अशी सूचना आमदारांकडे मांडली.मालवण शहराला जोडणारा मालवण-कसाल राज्यमार्ग हा महत्वपुर्ण मानला जातो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या मागार्ची पूर्णत: वाताहत झाली होती. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून जावे लागत होते. त्यामुळे खड्डेमय रस्त्यावर कार्यवाही करण्यासाठी गतवर्षी सुमारे २१ लाखाचा निधी खर्ची घालण्यात आला होता. मात्र खड्ड्यांची झालेली चाळण पाहता निधी अपुरा पडत होता. याबाबत आमदार नाईक यांनी पाठपुरावा करून नव्याने २ कोटी ७० लाखाचा निधी आणला आहे.त्या ठेकेदाराकडे राहणार देखभाल दुरुस्तीची जबाबदारीराज्यमार्गाच्या डांबरीकरणासाठी नव्याने २ कोटी मंजूर झाले असले तरी या मागार्ची देखभाल दुरुस्तीचा घेतलेल्या ठेकेदाराला आपल्या नियोजित कामांची पूर्तता करावी लागणार आहे. मार्गावरील धोकायदायक ठिकाणी हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येणार असल्याने खड्डे बुजविण्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडून खड्डे बुजविणे, झाडी तोडणे तसेच साईडपट्टी सुस्थितीत करण्याबाबत देण्यात आलेली जबाबदारी कायम असेल, असे आमदार नाईक यांनी सांगितले.वाहतुकीस धोकादायक ठिकाणे मालवण देऊळवाडा, आनंदव्हाळ पूल, चौके, साळेल, कुणकवळे, कट्टा, सावरवाड, रानबांबुळी याठिकाणी रस्ता वाहतुकीस अतिधोकादायक बनला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हॉटमिक्स डांबरीकरण प्राधान्याने याठिकाणी होणे आवश्यक आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गVaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्ग