शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

'यात्रोत्सवा'तून मालवण आगाराला ११ लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 11:06 IST

आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रोत्सव काळात नियोजन करण्यात आलेल्या जादा बस फेऱ्यांच्या माध्यमातून मालवण आगाराला ११ लाख १७ हजाराचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे पाच हजार प्रवाशांची घट झाली असली तरी उत्पन्नाचा विचार करता ७५ हजाराचे वाढीव उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांनी दिली.

ठळक मुद्देआगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांनी दिली माहिती प्रवासी संख्येत घट मात्र भारमानात काहीअंशी वाढ

मालवण : आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रोत्सव काळात नियोजन करण्यात आलेल्या जादा बस फेऱ्यांच्या माध्यमातून मालवण आगाराला ११ लाख १७ हजाराचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे पाच हजार प्रवाशांची घट झाली असली तरी उत्पन्नाचा विचार करता ७५ हजाराचे वाढीव उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांनी दिली.मालवण आगारातून आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रोत्सवासाठी एसटी बसचे नियोजन करण्यात आले होते. आंगणेवाडी मार्गावर २४ ते २६ फेब्रुवारीपर्यंत ७८० फेऱ्या सोडण्यात आल्या. यात ३७ हजार ६९७ प्रवाशांनी लाभ घेतला. 

कुणकेश्वर मार्गावर ४ ते ६ मार्च या कालावधीत एसटीच्या ३०४ बस फे?्यातून १४ हजार ६५० प्रवाशांनी प्रवास केला. गतवर्षी दोन्ही यात्रोत्सवास सुमारे ५७ हजार ५६८ प्रवाशांनी लाभ घेतला यावर्षी मात्र पाच हजाराने घट होऊन ५२ हजार ३४७ प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला.आंगणेवाडीला जाण्यासाठी मालवण बसस्थानक, टोपीवाला हायस्कुल, देवबाग, वराड, तळगाव, तिरवडे, कट्टा, पोईप, खालची देवली, आंबेरी मसुरे, डांगमोडे या ठिकाणावरून बसफेºया सोडण्यात आल्या होत्या.

आंगणेवाडी यात्रोत्सवातून मालवण आगाराला ६ लाख ६७ हजार ९३५ रुपयाचे उत्पन्न मिळाले. तर कुणकेश्वरला जाण्यासाठी मालवण बसस्थानक, आचरा, आडबंदर, मोर्वे, मिठबाव, तांबळडेग, कातवण या मार्गावर एसटी बसचे नियोजन करण्यात आले होते.

कुणकेश्वर यात्रोत्सवातून ४ लाख ४९ हजार २९१ रुपयाचे उत्पन्न मिळाले. याशिवाय मुंबई, पुणे मार्गावरही जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते, असे बोधे यांनी सांगितले.

प्रवाशांच्या सेवेसाठी..आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांच्या मार्गदर्शनाखाली चालक, वाहक व मेकॅनीक, अन्य कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेऊन प्रवाशांना चांगली सेवा दिली. यात्रोत्सवात काळात चालक संतोष पाटील, रवी राणे, दीपक ढोलम यांच्यासह अन्य चालकांनी आपल्या ताब्यातील बस सजवून प्रवाशांना चांगली सेवा देताना प्रवाशांना प्रवास कंटाळवाना होऊ नये यासाठी मराठी, हिंदी, देशभक्तीपर गीतांची व्यवस्था करण्यात आली होती.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळReligious programmeधार्मिक कार्यक्रमsindhudurgसिंधुदुर्ग